इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सप्टेंबरनंतर, ऑक्टोबर महिन्यातही अनेक मोठे सण आहेत. त्यामुळे विविध शहरांमधील बँक कर्मचाऱ्यांना तब्बल २१ दिवसांची सुट्टी असेल. अशा परिस्थितीत, जर तुमचेही ऑक्टोबर महिन्यात बँकेत काही महत्त्वाचे काम असेल, तर त्या दिवशी तुमची जवळची बँक बंद तर नाही ना हे नक्की पहा. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या कायम आहेत. जाणून घेऊया ऑक्टोबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील..
यावेळी ऑक्टोबर महिन्यात दसरा, दुर्गापूजा, गांधी जयंती, दिवाळी असे अनेक महत्त्वाचे सण आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्ट्या मिळणार आहेत. ऑक्टोबरमधील सुट्ट्यांमुळे ईशान्येकडील कामांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. त्रिपुरा, सिक्कीम, बंगाल, झारखंड आणि ओरिसा या राज्यांतील बँका ऑक्टोबर महिन्यात सलग ४ दिवस बंद राहतील.
ऑक्टोबर महिन्यातील बँक सुट्यांची यादी अशी
१ ऑक्टोबर – सहामाही बंद – सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
२ ऑक्टोबर – गांधी जयंती
३ ऑक्टोबर – सिक्कीम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, केरळ, बिहार आणि मणिपूरमध्ये दुर्गापूजेमुळे (महाअष्टमी) बँका बंद राहतील.
४ ऑक्टोबर – दुर्गापूजा (दसरा)/ शंकरदेवाच्या जयंतीनिमित्त कर्नाटक, ओरिसा, सिक्कीम, केरळ, बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, आसाम, बिहार आणि मेघालय या राज्यांतील बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.
५ ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दशमी)/शंकर देव जन्मोत्सवानिमित्त मणिपूर वगळता देशभरातील बँका बंद राहतील.
६ ऑक्टोबर – गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे बँका बंद राहतील.
७ ऑक्टोबर – गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे बँका बंद राहतील.
१३ ऑक्टोबर – करवा चौथमुळे बँका बंद राहणार आहेत.
१४ ऑक्टोबर – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
१८ ऑक्टोबर – गुवाहाटीमध्ये काटी बिहूनिमित्त बँका बंद राहतील.
२४ ऑक्टोबर – कालीपूजा/नरक चतुर्दशी/दिवाळी/लक्ष्मीपूजानिमित्त हैदराबाद, इंफाळ आणि गंगटोक वगळता देशातील इतर शहरांमध्ये बँका बंद राहतील.
२५ ऑक्टोबर – गंगटोक, हैदराबाद, इंफाळ आणि जयपूरमध्ये लक्ष्मीपूजन/दिवाळी/गोवर्धन पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
२६ ऑक्टोबर – अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, डेहराडून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, शिलाँग आणि शिमला येथे भाई दूज सारख्या सणानिमित्त बँका बंद राहतील.
२७ ऑक्टोबर – लखनौ, कानपूर, इंफाळ आणि गंगटोकमध्ये भाई दूज/चित्रगुप्त सारख्या सणांमुळे बँका बंद राहतील.
२८ ऑक्टोबर – अहमदाबाद, पाटणा आणि रांची येथील बँका दाला छठ/सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त बंद राहतील.
साप्ताहिक सुट्टी
८ ऑक्टोबर आणि २२ ऑक्टोबरला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. त्याचबरोबर २, ९, १६, २३ आणि ३० ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने बँक कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी असेल.
October 2022 Bank Holidays List RBI