इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विद्यार्थिनींनो व्हॅलेंटाईन डेला बॉयफ्रेंडसोबतच महाविद्यालयात प्रवेश मिळेल, अशा आशयाची प्राचार्यांची सही असलेल्या नोटीसीचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ बघणाऱ्या साऱ्यांनाच धक्का बसला आहे. ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नोटीस काढून बॉयफ्रेंड बंधनकारक केले असल्याचा दावा व्हीडिओतून करण्यात आला आहे. पण, ही फेक नोटीस असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील एसव्हीएम स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ही नोटीस काढली असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयात एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्राचार्याची बनावट स्वक्षरी करून उपद्रवी तत्वांनी हा उपद्व्याप केला असल्याचे समोर आले आहे.
प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न
याबाबत प्राचार्य बिजय कुमार पात्रा म्हणाले की, उपद्रवी तत्त्वांनी हा व्हीडिओ व्हायरल केला आहे. महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्यासाठी हे केले गेले आहे. पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपल्या स्वाक्षरीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोपही मुख्याध्यापकांनी केला आहे.
यापूर्वीही घडला प्रकार
‘व्हॅलेंटाईन डे’च्या मागेपुढे अशा प्रकारच्या बनावट नोटिस व्हायरल करण्याचा प्रकार जुनाच आहे. २०१८ मध्ये चंडीगड विद्यापीठाचा असाच एक निर्देश व्हायरल झाला होता. त्यातही ‘जो कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशिवाय विद्यापीठात दिसेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि दंड आकारला जाईल, असा इशारा दिला गेला होता.
विद्यापीठ कर्मचाऱ्याचा प्रताप
चौकशीत विद्यापीठातीलच एकाने हे बनावट पत्र टाईप करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधिताची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली. बनावट नोटीसमध्ये बॉयफ्रेंड बंधनकारक करण्यासोबतच विद्यार्थिनींना बॉयफ्रेंडसोबत क्लिक केलेला फोटो दाखवणेही आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. या व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांत भीती निर्माण झाली होती. नोटीसच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. प्राचार्यांनी ही नोटीस बनावट असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.
Notice Viral Valentine Day Boyfriend Compulsory