बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काय सांगता! या देशांमध्ये आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही; कसं काय?

by India Darpan
सप्टेंबर 29, 2021 | 5:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नवी दिल्ली – संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे त्रस्त असताना काही देश मात्र अजूनही आमच्याकडे कोरोना व्हायरस आला नसल्याचा दावा करत आहेत. तुर्कमेनिस्तान, उत्तर कोरिया आणि स्वतंत्र बेटे असलेले तीन छोटे देश अशा एकूण पाच देशात कोरोनाची कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत, असा दावा केला जात असल्याचे मत जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आणि डब्ल्यूएचओने नोंदविले आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यानेही आपल्या देशात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे नाकारले आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, येथील सरकार सत्य लपवत असतील, त्यामुळे या साथीला सामोरे जाण्याच्या प्रयत्नांना अडथळा येऊ शकतो. त्याचप्रमाणे तुर्कमेनिस्तानचे कथीत जुलमी अध्यक्ष गुरबांगुली बर्डीमुखमेडोव्ह यांनी कोरोनाचे अहवाल बनावट असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांचा असा दावा आहे की देशात कोरोनाचे एकही प्रकरण नाही. गुरबांगुली यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करताना सांगितले की, कोरोनाबाबत राजकारण करू नये. गुरबांगुली २००६ पासून तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष आहेत.

दुसरीकडे, तुर्कमेनिस्तानबाहेरील स्वतंत्र संस्था, पत्रकार आणि कार्यकर्ते म्हणतात की, देशाला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. याचे भक्कम पुरावे आहेत. त्यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्या ६० हून अधिक लोकांची नावे वैयक्तिकरित्या गोळा केली आहेत. यामध्ये शिक्षक, कलाकार आणि डॉक्टरांचा समावेश आहे. तुर्कमेनिस्तानसोबत खूप मोठी सीमा असलेल्या शेजारच्या इराणला साथीच्या आजाराने मोठा फटका बसला आहे.

त्याप्रमाणे उत्तर कोरिया देशाने डब्ल्यूएचओला असेही सांगितले आहे की, आमच्या देशातील हजारो लोकांच्या कोरोना चाचण्या घेतल्या आहेत, परंतु या काळात संक्रमणाचा एकही प्रकरण समोर आलेले नाही. तर दक्षिण कोरिया आणि चीनच्या शेजारी देशांनी आतापर्यंत संक्रमणाची लाखो प्रकरणे नोंदवली आहेत. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी उत्तर कोरियाच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मात्र उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी सर्व विदेशी पर्यटकांवर बंदी घातली आणि एका आठवड्यानंतर आणीबाणीची स्थिती घोषित केली. शाळा बंद करण्यासारख्या कठोर उपायांची अंमलबजावणी केली. त्यानंतर, नवीन रुग्णालये बांधण्याचे आदेश दिले. तथापि, या काळात त्याने कोरोनाचा कोणताही उल्लेख केला नाही. त्याच वेळी, महिन्याच्या अखेरीस, सरकारने दहा हजार लोकांना अलग ठेवले होते. तरीही आमच्या देशात कोरोना नाही असे उत्तर कोरिया सांगत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘डिजिटल बारामती अम्ब्रेला’ ॲप लॉन्च; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

या आयटी कंपनीत आता तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी; म्हणून घेतला निर्णय…

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

या आयटी कंपनीत आता तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी; म्हणून घेतला निर्णय...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011