नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कर आकारणी विभागाच्या वतीने पाण्याचे स्पॉट बिलिंग कामकाज एजन्सीमार्फत सुरू करण्यात आले असून, या उपक्रमाचा शुभारंभ प्रशासक तथा आयुक्त मनीषा खत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
नाशिक महापालिका क्षेत्रातील मिळकतधारकांच्या नळ कनेक्शनवरील पाणीवापराचे बिल आता थेट स्पॉट बिलिंग पद्धतीने दिले जाणार आहे. यासाठी कॅनबेरी एनलिटिक्स प्रा. लि. या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून, कामकाज सुरू झाले आहे.
एजन्सीमार्फत पाणी मीटर तपासणीचे काम देखील हाती घेतले जाणार आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्याप पाणी मीटर बसवलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर मीटर बसवून त्याची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे.