इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दादर येथील अमर हिंद मंडळच्या ७८व्या वसंत व्याख्यानमालेतून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टोल नाक्याबाबत मोठी घोषणा केली. आता जितका प्रवास, तितकाच पथकर द्यावा लागेल या धोरणाची अंमलबजावणी १५ दिवसांत केली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी टोलनाक्यावर आता वाहनांना थांबावे लागू नये, यासाठी उपग्रहाआधारित पथकराची व्यवस्था केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
रस्ते बांधणीसाठी यंदा ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून नवे रस्ते बांधले जात असतांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या रस्त्यावर जितेके किलोमिटर चालवली जाईल तितकाच पथकर घेतला जाईल असे धोरण लवकर आणण्यात येणार अशी माहिती गडकरी यांनी दिली. पण, मी महाराष्ट्र टोलबाबत बोलत नाही. एनएचआय राष्ट्रीय महामार्गाबाबत बोलतोय असे नितीन गडकरी यांनी म्हटले. आता टोलनाके राहणार नाहीत. पण, सॅटेलाईट सिस्टीमव्दारा तुम्ही तिथून निघाल्यानंतर तुमच्या नंबरप्लेटवरुन तुमच्या बॅंक अकाऊंटमधील पैसे कपात होतील अशी माहिती त्यांनी दिली.