इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मालेगावचे प्रसाद बळीराम हिरे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याअगोदर माजी नगरसेविका डॅा. हेमलता पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता हिरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठे धक्के बसत आहे.
प्रसाद हिरे हे भाऊसाहेब हिरेंचे नातू आहे. राज्याचे आरोग्य, पाटबंधारे, ऊर्जा, शिक्षण अशा विविध खात्यांची कॅबिनेट मंत्रीपदे भूषवलेले स्वर्गीय डॉ. बळीरामजी हिरे यांचे ते चिरंजीव आहेत. मुंबईतील भाजपच्या नरीमन पॉइंट येथील कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रसाद हिरे भाजप प्रवेश करणार आहे.
दुपारी २ वाजता होणाऱ्या प्रवेश सोहळ्यासाठी मालेगावातून ३०० पेक्षा अधिक वाहनांनी कार्यकर्ते सकाळी मुंबईला रवाना झाले आहे. प्रसाद हिरे हे कै. भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट या अग्रगण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपकडून विधानसभा, विधान परिषद निवडणूक लढवली आहे.