मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गडकरींचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, प्रश्नच मार्गी लागला!

by India Darpan
एप्रिल 14, 2025 | 7:25 am
in संमिश्र वार्ता
0
WhatsApp Image 2025 04 13 at 16.30.03

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रमात ‘ऑन दि स्पॉट’ निकालावर भर असतो. रविवारी (दि. १३ एप्रिल) पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. बुलढाण्यातून आलेल्या दिव्यांगांना मदत व्हावी यासाठी गडकरींनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. थोड्याच वेळात मंत्री महोदयांचे पत्र सोबत आलेल्या दिव्यांगांना सोपवण्यात आले. तसेच मदत मिळण्याचा मार्गही मोकळा झाला.

खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी सकाळपासूनच गडकरी यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. कुणी वैयक्तिक तर कुणी प्रशासकीय अडचणींच्या संदर्भात निवेदने दिली. यातच बुलढाण्याहून मतिमंद निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत मिळावी असे निवेदन काहींनी दिले. त्यानंतर गडकरी यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना फोन लावला. त्यांना केंद्र सरकारच्या अॅडीप योजनेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे अगदी काही मिनिटांतच गडकरी यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही गेले. त्यावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.

नागपुरातील अयोध्यानगर परिसरातील काही नागरिकांनी नाल्याचे पाणी वस्तीत शिरत असल्याचा मुद्दा निवेदनाद्वारे मांडला. यासंदर्भात ना. श्री. गडकरी यांनी त्याच क्षणी मनपा आयुक्तांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली आणि तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. काही नागरिकांनी गेल्या जनसंपर्क कार्यक्रमात दिलेल्या निवेदनावर कार्यवाही झाल्याचे सांगत मंत्री महोदयांचे आभार मानले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आशा गट प्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा आयटकचे ३ रे जिल्हा अधिवेशन या तारखेला…

Next Post

बोगस शिक्षक घोटाळाप्रकरणी तिघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Next Post
jail11

बोगस शिक्षक घोटाळाप्रकरणी तिघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

जून 17, 2025
jail1

मतीमंद अल्पवयीन मुलावर दोघांनी केला बलात्कार, आरोपी गजाआड…नाशिकमधील घटना

जून 17, 2025
Sharad Pawar

शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन गट एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक….

जून 17, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण १० निर्णय

जून 17, 2025
IMG 20250617 WA0248 2

प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित….

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011