निफाड – तालुक्यातील दात्याणे येथील काटवन वस्ती रस्त्यावरील ग्रा.मा. ३९७ या बाणगंगा नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते आज संपन्न झाले. सदर पुल कदम यांच्या प्रयत्नाने नाबार्ड-२५ योजने अंतर्गत सन २०१९ मध्ये मंजूर झालेला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळून तत्कालीन बजेटप्लेट मध्ये त्याचा समावेश झालेला आहे. आचारसंहीता व लॉकडाऊन सारख्या तांत्रिक अंडचणींमुळे त्याचा कार्यारंभ आदेश २०२१ नुकताच मिळाला. त्यामुळे आज अनिल कदम, दीपक शिरसाठ यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. त्यामुळे दात्याणेसह पंचक्रोषीतील नागरीकांना दळणवळण सुलभ होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. यावेळी भूमिपूजन कार्यक्रमास जि.प. सदस्य दिपक शिरसाठ, पं.स.मा.सभापती राजेश पाटील, आनंदराव बोराडे, बाळासाहेब पवार, त्रंबकराव पवार, मंडलिक गुरगुडे, भास्कर गवळी, अर्जून तात्या बोराडे, अरुण सांगळे, विक्रम पवार, भाऊसाहेब गुरगुडे , वसंत गुरगुडे , शिवाजी गुरगुडे , गंगाराम गुरगुडे , बाळासाहेब गुरगुडे , गोविंद पवार, काशिनाथ पवार, दगु गवारे, विष्णुपंत बोराडे, तानाजी बोराडे,जानकीराम पवार, ज्ञानेश्वर गुरगुडे , जनार्दन गुरगुडे , बाळासाहेब दिघे, सोपान बोराडे, सचिन गुरगुडे , सागर गुरगुडे , अरुण गवळी, सागर गवळी, कॉंट्रक्टर संदिप दरगोडे आदि मान्यवर उपस्थित होते. अनिरुध्द पवार यांनी प्रास्तविक केले तर प्रदीप पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.