नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन दिवसांच्या निमा बँक समिटचे काल सूप वाजले. एकूण १८ हजारांहून अधिक लोकांनी समिटला भेट दिली. दोन दिवसांत हजाराहून अधिक उद्योजकांच्या कर्जप्रकरणांचा मार्ग मोकळा झाला ही समिटची खरी फलनिष्पत्ती म्हणावी लागेल,असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.काल समिट बघण्यास तोबा गर्दी झाली होती.यात युवा वर्गाचा भरणा अधिक होता हे विशेष.
यावेळी उद्योजक तसेच समिटला भेट देणाऱ्यांनी बँकांच्या विविध योजनांची तसेच कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता कशी करावी त्याची माहिती जाणून घेतली.विशेषतः स्टार्टसअप सुरू करण्यावर उदयोन्मुख उद्योजकांचा कल असल्याचे आणि त्यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्याची त्यांची धावपळ यावेळी दिसून आली.समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक नीलेश मुळे आणि युनियन बँकेचे उप महाव्यवस्थापक सुमेरसिंग तर व्यासपीठावर निमा अध्यक्ष धनंजय बेळे, डी.जी.जोशी, गोविंद झा,राजेंद्र अहिरे,शशांक मणेरीकर आदी होते.प्रमुख पाहुण्यांनी या निमा समिट उपक्रमाचे कौतुक करून उद्योजकांच्या कर्ज प्रकरणाबाबत त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.निमाने रोजगार मेळावा घेण्याची सूचना नीलेश मुळे यांनी केली.
समिटमध्ये कोरोनाच्या काळात उद्योगांची चाके मंदावली होती. त्यानंतर आता त्यातून ते बरेच सावरले असले तरी पूर्वीप्रमाणे उभारी येण्यास त्यांना नव्याने वित्तपुरवठा तसेच काहींना कर्जांच्या हप्त्यांची पुनर्रचना करून घ्यायची होती.त्याबाबत विविध राष्ट्रीयीकृत तसेच खासगी व सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. काल दिवसभरात स्टार्टअप्स कंपन्यांना सीजीटीएमएसई अंतर्गत कर्जपुरवठा,डिजिटल बँकिंग व्यापार व सोल्युशन,आजारी उद्योगांचे पुनरुजीवन आणि कर्जाची पुनर्रचना, लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी सहकारी बँकांचे योगदान,परकीय चलन सेवा आणि निर्यात विषयक पतपुरवठा आदी विषयांवर ऋषिकेश वाकडकर, अरविंद मोहपात्रा,अभय वडगावकर, दीपक चौधरी,अरविंद देशपांडे,विवेक चौधरी,योगेश पाटील,रियाज आलम, प्रमोद पुराणिक,रणजीत सिंग,विजय बेदमुथा,यतीन पटेल,राजीव सौरभ, संजय ठाकूर आदि बँकिंग तसेच क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांची मार्गदर्शन पर व्याख्याने झाली.यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्ननांची व्याख्यात्यांनी समर्पक उत्तरे देऊन सर्वांच्या शंकांचे निरसन केले.सूत्रसंचालन समिटचे समनव्ययक शशांक माणेरीकर यांनी केले.
बँक ऑफ महाराष्ट्र,सेंट्रल बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया,एस.के.डी. कन्सल्टंट यांचा प्रमुख सहभाग समिट मध्ये होता.त्यांनी प्रायजोकत्व स्वीकारले होते.सह आयुक्त(उद्योग विभाग)यांचेही विशेष सहकार्य लाभले.सिडबी,स्टेट बँक, आयसीआयसीआय,विश्वास बँक, एचडीफसी, कोटक महिंद्रा, नामको, जनलक्ष्मी,सारस्वत,पंजाब नॅशनल, महाराष्ट्र ग्रामीण, लोकमान्य राबीएल, अर्थालय,अर्थयान या उद्योगांना आर्थिक बाबीत मार्गदर्शन करणाऱ्या कंपन्यांसहित अन्य बँकानीही यात सहभाग नोंदवला होता.
समिटच्या यशस्वीतेसाठी समिटचे अध्यक्ष गोविंद झा,समनव्ययक डी.जी. जोशी,निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी,आशिष नहार,मानद सचिव राजेंद्र अहिरे,शशांक मणेरीकर, खजिनदार विरल ठक्कर, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे ,राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत , वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे , जितेंद्र आहेर, मनीष रावळ,श्रीकांत पाटील, एस.के.नायर, सुधीर बडगुजर , सुरेंद्र मिश्रा,सतीश कोठारी आदींनी परिश्रम घेतले.