गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

PFIचा होता हा भयंकर कट; NIAच्या तपासात उघड झाली ही धक्कादायक माहिती

by Gautam Sancheti
सप्टेंबर 25, 2022 | 11:13 am
in मुख्य बातमी
0
Popular Front of India PFI

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेविषयी आणि तिने रचलेल्या कटाविषयी अतिशय गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सध्या ताब्यात घेतले आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या संघटनेने अनेक कट रचल्याचे स्पष्ट होत आहे.

भारताला येत्या २५ वर्षात मुस्लिम राष्ट्र बनविण्याच्यासाठी पीएफआय संघटनेने गुप्तपणे भयानक कट रचला होता. आणखी भयंकर बाब म्हणजे या कामात काही मुस्लीम राष्ट्र त्यांना प्रचंड पैसा पुरवत असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

गेल्या आठवड्याभरात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) दहशतवादी संघटनेच्या सुमारे १५ राज्यातील अड्ड्यांवर छापे टाकून त्यात विविध विभागात काम करणाऱ्या सुमारे १००पेक्षा जास्त अतिरेकी तरुणांना अटक केली आहे, त्यातून तपास यंत्रणेला देश विघातक कृत्यांची ही माहिती हाती लागली आहे, त्यामुळे देशभरात काय उडाली आहे.

पीएफआय संघटनेकडून अनेक राज्यातील मुस्लीम तरुणांना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखविण्यात येत होते, तसेच भारताला सन २०४७ पर्यंत कोणात्याही प्रकारे मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा पीएफआयचा कट होता, असा दावा देखील राष्ट्रीय तपास संस्थेने केला. शनीवार, दि. २४ रोजी धरपकड केलेल्या ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी करताना कोर्टात केलेल्या निवेदनात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

एनआयएच्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील २५ वर्षात हिंसाचार पसरवून भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा पीएफआय’च्या चा डाव आहे, यासाठी आखाती देशातून पीएफआयला मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फंड देखील मिळत होता. इतकेच नव्हे तर ‘पीएफआय’चे नेते व कार्यकर्ते अनेक बेकायदा कारवायांमध्ये गुंतल्याचा दावा ‘एनआयए’ने केला आहे. देशातील नागरिकांमध्ये धार्मिक तेड व द्वेष निर्माण करणे, अशांतता निर्माण करणे, सर्वत्र असंतोष निर्माण करणे आदी कारवाया ‘पीएफआय’ करीत असल्याचे तपास यंत्रणे म्हटले आहे.

अटक केलेल्या या दहशतवादी कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून अनेक भयंकर गोष्टी उघड झाल्याचा दावा देखील ‘एनआयए’ने केला आहे. छाप्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्रांची आणि स्फोटक सामान व संशयास्पद कागदपत्राची कसून तपासणी करण्याची परवानगीही ‘एनआयए’ने कोर्टाकडे मागितली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए’ने) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी) देशातील वेगवेगळ्या राज्यात छापे टाकून केलेल्या या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पीएफआय’च्या १०६ पदाधिकारी- कार्यकर्त्यांना अटक केली होती. यात आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले किंवा देशभरात खळबळ उडाली होती.

गेल्या १५ वर्षांत केरळ सह आजूबाजूच्या भागात मर्यादित असलेली पीएफआय संघटना आता देशभरात पसरली असून देशात गेल्या ५ वर्षांत अनेक ठिकाणी दंगली झाल्या, तेथील सुरक्षा एजन्सीने वेळोवेळी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. अन्य धर्मीयांना दहशतीखाली ठेवून नागरिकांमध्ये भीती पसरवण्याचा कट आखल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते, असेही ‘एनआयए’ने म्हटले आहे.

याबाबत केरळचे मुख्यमंत्री आहे की, ‘पीएफआय’ने पुकारलेल्या बंद दरम्यान केरळमध्ये घडलेला हिंसाचार पूर्वनियोजित होता. तसेच ‘पीएफआय’वर बंदी घालण्यात यावी, असे राज्य सरकारचे मत आहे. याबाबत आम्ही वारंवार केंद्राला विनंती केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या ‘पीएफआय’च्या ४२ कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. त्याआधी ‘एनआयए’ने कोंढवा भागात छापा टाकून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

NIA Investigation PFI Conspiracy Terrorism India

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्‍हेलिअन – खरे खेळाडू आणि त्यांच्या खिलाडूवृत्तीचे दर्शन

Next Post

धक्कादायक! ‘कॅट’नंतर आता DRDO कार्यालयाची ड्रोनद्वारे रेकी? नाशकात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक! 'कॅट'नंतर आता DRDO कार्यालयाची ड्रोनद्वारे रेकी? नाशकात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011