मुंबई – एनआयए आणि एटीएसने काही दिवसापूर्वी देशभरातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आज पुन्हा कारवाई केली. आज राज्यभरातून ५० हून अधिक पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. औरंगाबाद, नांदेड, जालना परभणीसह मालेगावचा यात समावेश आहे. मालेगावमधून पहाटे दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. याअगोदरही मालेगावमधून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. आज पुन्हा ही कारवाई केल्यामुळे मालेगावमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.