नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली आहे. देशाच्या राष्ट्रपतींनी किती वेतन मिळते आणि त्यांना किती कर भरावा लागतो, याबाबत सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना किती वेतन मिळते, कोणते लाभ मिळतात, त्यांना कर किती भरावा लागतो, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
राष्ट्रपतींना खरे तर १ लाख ५० हजार रुपये वेतन भारतात मिळायचे. मात्र २०१७ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने हे वेतन वाढवून ५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. प्राप्तिकर अधिनियम आणि राष्ट्रपती पेन्शन अधिनियम या वेतनावर कर सवलत देत नाहीत. त्यामुळे राष्ट्रपतींना ५ लाख रुपयांवर २ लाख ७५ हजार रुपये कर भरावा लागतो. पण राष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुविधाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांना निवास भत्ता, आरोग्य सुविधा, मोफत प्रवास आदी सुविधा मिळतात. निवृत्तीनंतर दीड लाख रुपये निवृत्तीवेतनही मिळत असते. त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांवर खर्च करण्यासाठी ६० हजार रुपये अतिरिक्तही मिळतात.
तरीही कमीच
राष्ट्रपतींना ५ लाख रुपये वेतन असून त्यातील २ लाख ७५ हजार रुपयांचा प्राप्तीकरात जातो. कर भरल्यावर हाती येणारी रक्कम राष्ट्रपतींच्या कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा कमी आहे. त्यामुळेच असेही बोलले जाते की राष्ट्रपतींचे वेतन तसे कमीच आहे.
New President Draupadi Murmu Salary Income Benefits