India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सापडले नव्या प्रकारचे पठार; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये, यांच्या संशोधाला यश

India Darpan by India Darpan
January 20, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर क्वचितच आढळणारे बसाल्ट दगडाचे पठार (याला ‘सडा’ असेही म्हणतात) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत आढळले असून या पठारावर वनस्पतींच्या २४ विविध कुळांमधील ७६ प्रजातींची नोंद झाली आहे. जागतिक पातळीवर जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण आणि म्हणून धोक्यात असलेल्या भारतातील चार ‘ग्लोबल बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट’पैकी एक सह्याद्रीची रांग आहे. या रांगेत आढळलेल्या या नव्या पठारावरील प्रजातींचा अभ्यास केल्यास हवामान बदलामुळे प्रजातींच्या अतिजीवितेवर (survival) होणाऱ्या परिणामांविषयक माहितीचा साठा त्यातून खुला होईल, अशी शक्यता आहे. या माहितीमुळे खडकाळ पठारांचे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व व त्यांच्या संवर्धनाच्या गरजेविषयी जनजागृती करण्यास मदत होईल.

पुणे स्थित ‘आघारकर संशोधन संस्था’ गेले दशकभर सह्याद्रीतील, विशेषतः खडकाळ पठारांवरील जैवविविधतेचा अभ्यास करत आहे. खडकाळ पठारांवर मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ प्रजातींमुळे ही पठारे महत्त्वपूर्ण अधिवास ठरतात. या अधिवासात जगण्या-वाढण्यासाठी प्रजातींना आव्हानात्मक नैसर्गिक बाबींशी सातत्याने जुळवून घ्यावे लागते. या पठारांवर पावसाळ्यापुरते पाणी उपलब्ध होते, माती व अन्नांश मर्यादित असतो. त्यामुळे हवामान बदलाचे प्रजातींच्या अतिजीवितेवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी हा अधिवास सुयोग्य प्रयोगशाळा ठरेल. अतिविषम परिस्थितीत प्रजाती कशा टिकाव धरतात याविषयीच्या माहितीचा ही पठारे उत्तम स्रोत आहेत.

आघारकर संशोधन संस्थेच्या चमूचे नेतृत्त्व करणाऱ्या डॉ. मंदार दातार यांनी अलीकडेच ठाणे जिल्ह्यातील मांजरे गावात समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर असलेले बसाल्टचे पठार उजेडात आणले. या प्रदेशात असलेल्या खडकाळ पठारांचा हा चौथा प्रकार आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर असलेली बसाल्टची, लॅटराईट (जांभा) ची आणि कमी उंचीवर असलेली जांभ्याची पठारे असे तीन प्रकार यापूर्वी या प्रदेशात दिसून आले आहेत.

या नव्या प्रकारच्या पठाराच्या सर्वेक्षणात वनस्पतींच्या २४ विविध कुळांमधील ७६ प्रजाती आढळल्या. अन्य तीन प्रकारच्या पठारांवर आढळणाऱ्या प्रजातींचा त्यात समावेश आहे. त्याचबरोबर, या पठारावरच आढळलेल्या विशिष्ट प्रजाती त्यात आहेत. हे पाहता बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीत प्रजातींचे आपापसांतील संबंध कसे बदलतात हे अभ्यासण्याकरता हे उदाहरण विशेष ठरेल. या संशोधनाबाबतचा शोधनिबंध स्प्रिंगर नेचरवर उपलब्ध संशोधन पत्रिका ‘नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स लेटर्स’ मध्ये प्रकाशित झाला. ठाणे जिल्ह्यात उत्तर सह्याद्रीत असलेल्या मांजरे गावात आढळलेल्या समुद्रसपाटीपासून कमी – १५६ मीटर – उंचीवरील बसाल्ट पठाराचे महत्त्व या शोधनिबंधात अधोरेखित केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –
डॉ. मंदार दातार ([email protected], 020-25325057), वैज्ञानिक, जैवविविधता व पुराजीवशास्त्र गट आणि डॉ. पी. के. धाकेफाळकर ([email protected], 020-25325002), संचालक (स्थानापन्न), आघारकर संशोधन संस्था, पुणे.


Previous Post

मालेगाव पोलिसांची कारवाई; सापळा रचत १ लाख ७६ हजाराचा गुटखा केला जप्त

Next Post

तबला… सतार… बासरी… नाशकात रंगणार या तीन कलाकारांची जुगलबंदी… कुठे, केव्हा, कधी?

Next Post

तबला... सतार... बासरी... नाशकात रंगणार या तीन कलाकारांची जुगलबंदी... कुठे, केव्हा, कधी?

ताज्या बातम्या

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023

ही पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय; युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group