विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारात भाकरी फिरविली आहे. त्यामुळेच जुन्या मंत्रिमंडळातील तब्बल एक डझन मंत्र्यांना त्यांनी सोडचिठ्ठी दिली. त्यात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांचा समावेश आहे. नव्या मंत्रिमंडळात मोदींनी फारच मोठे बदल केले आहेत. या बदलांमागची संपूर्ण कारणे अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाहीत.
असे आहे नवे मंत्रिमंडळ (मंत्र्याचे नाव आणि त्यांचे खाते असे)
कॅबिनेट मंत्री
नरेंद्र मोदी – पेन्शन, सार्वजनिक तक्रारी, अणुऊर्जा, अंतराळ
राजनाथ सिंग – संरक्षण
अमित शहा – गृह, सहकार
नितीन गडकरी – रस्ते व वाहतूक
निर्मला सीतारामन – अर्थ
नरेंद्र सिंग तोमर – कृषी
एस जयशंकर – परराष्ट्र
अर्जुन मुंडा – आदिवासी
मनसुख मांडवीय – आरोग्य
अश्विनी वैष्णव – रेल्वे
पियुष गोयल – वस्त्रोद्योग
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण
प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज, खाणकाम, कोळसा
हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम
ज्योतिरादित्य शिंदे – हवाई वाहतूक
अनुराग ठाकूर – माहिती तंत्रज्ञान व क्रीडा
भूपेंद्र यादव – कामगार, पर्यावरण
किरण रिजिजू – सांस्कृतिक
स्मृती इराणी – महिला व बालकल्याण
नारायण राणे – लघुउद्योग
सर्बानंद सोनोवाल – आयुष, बंदरे
मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक
डॉ. विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय
गिरीराज सिंग – ग्रामीण विकास, पंचायत राज
रामचंद्र सिंग – स्टील
पशुपती कुमार पारस – अन्न प्रक्रिया उद्योग
गजेंद्रसिंग शेखावत – जलशक्ती
राज कुमार सिंग – ऊर्जा, अपारंपरिकक ऊर्जा
महेंद्रनाथ पांडे – अवजड उद्योग
पुरुषोत्तम रुपाला – मत्स्य, पशुसंवर्धन
जी क्रृष्ण रेड्डी – सांस्कृतिक, पर्यटन,
राज्यमंत्री
मिनाक्षी लेखी – परराष्ट्र
रावसाहेब दानवे – रेल्वे
भागवत कराड – अर्थ
डॉ. भारती पवार – आरोग्य
कपिल पाटील – पंचायत
रावसाहेब दानवे – रेल्वे, कोळसा, खाणकाम
रामदास आठवले – सामाजिक न्याय
कॅबिनेट मंत्र्यांची यादी
राज्यमंत्र्यांची सविस्तर यादी अशी