India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हास्याची नवी जुगलबंदी! नवी कॉमेडी मालिका ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’; मकरंद अनासपुरेंचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

५ जानेवारी २०२३ पासून गुरुवार ते शनिवार रात्री १० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

India Darpan by India Darpan
December 31, 2022
in मनोरंजन
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेक्षकांचे आवडते हास्यवीर या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. नेहमी निरनिराळ्या स्किट्समधून आपल्याला हसायला भाग पडणारे हास्यवीर आता या विनोदी मालिकेतून आपल्या भेटीला येताहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

प्रेक्षकांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे हेसुद्धा ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत. सोबतच हास्यवीर समीर चौघुले, प्रभाकर मोरे, अरुण कदम, पृथ्वीक प्रताप, ईशा डे, वनिता खरात, ओम‌्कार राऊत, शिवाली परब, संदेश उपश्याम, दत्तू मोरे, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने हे कलाकारही या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ ही मालिका भूतकाळातील गोड आठवणींना उजाळा देणारी मालिका आहे. पारगाव नावाच्या एका गावात पोस्ट ऑफीस आहे. या पोस्टात काम करणारी मंडळी, त्यांचा रोजचा दिवस, त्यात तिथे घडणाऱ्या घटना या भोवती ही मालिका आणि तिची गोष्ट फिरते. त्याशिवाय या मंडळींच्या घरची गोष्टी आपल्याला पाहायला मिळेल.

अवघ्या महाराष्ट्राला पाठवत आहोत हास्याची मनी ॲार्डर…
नवी मालिका -'पोस्ट ऑफीस उघडं आहे…..'
लवकरच… सोनी मराठी वाहिनीवर… #पोस्टऑफीसउघडंआहे | #PostOfficeUghadAahe#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/cK36ayxFtG

— Sony मराठी (@sonymarathitv) December 1, 2022

सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या जोडीनी आजपर्यंत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आजवर त्यांनी प्रेक्षकांना हसायला भाग पडलं आहे. आता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ या त्यांच्या पहिल्या मालिकेद्वारे ते हास्याचा धमाका घेऊन येताहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणार आहेत. त्याबरोबरच प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर या मालिकेतून पाहायला मिळणार आहेत. समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, ईशा डे, दत्तू मोरे असे कलाकार या मालिकेत आहेत. प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे…’ ही विनोदी मालिका प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पाडेल यात शंका नाही. अवघ्या महाराष्ट्राला ही हास्याची मनी ॲार्डर नक्की आवडेल यात शंका नाही. पाहायला विसरू नका, नवी मालिका – ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’, ५ जानेवारी २०२३ पासून गुरुवार ते शनिवार रात्री १० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

'हसायचं मस्तं….हसायचं मस्ट…
घेऊन येतोय पोस्टाची गोष्ट….'
नवी मालिका -'पोस्ट ऑफीस उघडं आहे…..'
5 जानेवारीपासून, गुरु – शनि, रात्री 9 वाजता
सोनी मराठी वाहिनीवर… #पोस्टऑफीसउघडंआहे | #PostOfficeUghadAahe#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/6MUAjtjSWL

— Dash (@Dash72636811) December 16, 2022

New Marath Comedy TV Serial Post Office Ughda Aahe
Sony Marathi Entertainment


Previous Post

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माझे गुरू आहेत – राहुल गांधी

Next Post

स्थलांतर केले तरी मतदार यादीत बदल करण्याची झंझट मिटणार; आता मिळणार ही अनोखी सुविधा

Next Post

स्थलांतर केले तरी मतदार यादीत बदल करण्याची झंझट मिटणार; आता मिळणार ही अनोखी सुविधा

ताज्या बातम्या

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केली व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग सेवा; असा होणार ग्राहकांना फायदा

April 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group