इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ३ मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले. या जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्लॅटफॅार्म क्रमांक १४ आणि १६ वर ही घटना घडली
उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या कुंभमाळासाठी देशभरातून लोक तेथे जात आहे. शनिवारी कुंभमेळयासाठी जाणा-यांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर ही चेंगराचेंगरीची दु्र्घटना घडली. रात्री साडेआठच्या दरम्यान प्रयागराजला जाण्यासाठी भाविकांची गर्दी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झाली. यामुळे हा गोंधळ उडाला.
दरम्यान या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो. आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे.