मंगळवार, ऑगस्ट 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोण आहेत नवे सीडीएस अनिल चौहान? अशी आहे त्यांची जबरदस्त कारकीर्द

by Gautam Sancheti
सप्टेंबर 28, 2022 | 8:03 pm
in राष्ट्रीय
0
CDS ANIL CHAUHAN

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून  नियुक्ती करण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर अनिल चौहान यांच्याकडे सीडीएसची जबाबदारी आली आहे. अनिल चौहान यांना दहशतवादाविरुद्धच्या कारवायांमध्ये निपुणता आहे. बारामुल्लासह जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे लष्करी सल्लागार म्हणूनही चौहान यांनी जबाबदारी सांभाळली आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी..

संरक्षण मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, निवृत्त लेफ्टनंट जनरल भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील. १८ मे १९६१ रोजी जन्मलेले लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे देशाचे नवे सीडीएस असतील. १९८१ मध्ये ११ व्या गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली.

४० वर्षांची कारकिर्द
सुमारे ४० वर्षांच्या कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी अनेक कमांड, कर्मचारी आणि सहाय्यक नियुक्त्या केल्या आहेत. त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील बंडखोरीविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे. तसेच, त्यांना दहशतवाद्यांविरोधातील कारवायांमध्ये निपुणता आहे.

काश्मीरमध्ये जबाबदारी
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे आयएमए डेहराडून आणि नॅशनल डिफेन्स अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी मेजर जनरल पदावर उत्तर कमांडच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले आहे. नंतर ईशान्येतील एका कॉर्प्सचे कमांडिंग केले. सप्टेंबर २०१९ पासून पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले. ३१ मे २०२१ रोजी सेवेतून निवृत्त होईपर्यंत ते या पदावर राहिले.

अनेक पदके प्राप्त
लष्करातील शानदार आणि विशिष्ट सेवेसाठी, लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचेही लष्करी सल्लागार राहिले आहेत. चौहान यांनी अंगोलामध्ये संयुक्त राष्ट्र मिशन म्हणूनही काम केले आहे.

New CDS Left General Anil Chauhan Life Journey

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेतकऱ्यांना दिलासा! सौर कृषी पंपांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय

Next Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
carona 11

नाशिक - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या, मंगळवार, १२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 11, 2025
trump 1

अमेरिकेने लावलेले आयात शुल्क व कापड निर्यात धोरण व सद्यस्थिती नेमकी काय आहे…

ऑगस्ट 11, 2025
mahavitarn

महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे घरगुती ग्राहकांसाठी दिवसा स्वस्त वीजदर…या गोष्टी सुध्दा मोबाईलवर उपलब्ध

ऑगस्ट 11, 2025
Indian Flag

कुठल्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार?…बघा संपूर्ण यादी

ऑगस्ट 11, 2025
Untitled 13

क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान

ऑगस्ट 11, 2025
rape

खरकटे पाणी फेकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा परिचीताने केला विनयभंग

ऑगस्ट 11, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011