इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. या भीषण दुर्घटनेत ४५हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग आणि धुराच्या लोटाने धावपट्टी आणि विमानतळ परिसराला वेढले आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले असून ध्या विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.
https://twitter.com/jnkpjjitu/status/1614517199183687682?s=20&t=-kvkpjlaLLkKsucnBJWMSA
अपघाताबाबत माहिती देताना यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी सांगितले की, यती एअरलाइन्सच्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ क्रॅश झालेले प्रवासी विमान ATR-72 हे यती एअरलाइन्सचे आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या चित्रे आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
https://twitter.com/KazmiWajahat/status/1614514162880897026?s=20&t=-kvkpjlaLLkKsucnBJWMSA
मागील वर्षी मे महिन्यात खराब हवामानामुळे पहारी मुस्तांग जिल्ह्यात तारा एअरचे विमान कोसळले होते. या घटनेत २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. खराब हवामानामुळे विमान डावीकडे न जाता उजवीकडे वळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यामुळे विमान डोंगरावर जाऊन कोसळले होते. त्यानंतर आता पुन्हा हा एक भीषण अपघात झाला आहे.
https://twitter.com/AishPaliwal/status/1614509388630458368?s=20&t=-kvkpjlaLLkKsucnBJWMSA
Nepal Plane Crash Pokhara Airport 45 Death