India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

FCIमध्ये होणार अमुलाग्र परिवर्तन; भ्रष्ट व्यवहारात गुंतलेल्याची आता खैर नाही

India Darpan by India Darpan
January 15, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (वृत्तसेवा) – फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) अर्थात भारतीय अन्न महामंडळाचे जलद गतीने परिवर्तन व्हायला हवे जेणेकरुन ही संस्था देशातील लोकांना, गरिबांना आणि शेतकऱ्यांना मदत करत राहील असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज येथे एफसीआयच्या (FCI) ५९ व्या स्थापना दिनानिमित्त उद्घाटनपर भाषणात केले.

आपल्या भाषणात गोयल यांनी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांना प्रत्येक आठवड्याला एफसीआय(FCI) आणि सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (CWC) अर्थात केंद्रीय वखार महामंडळाच्या होणाऱ्या परिवर्तनावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आणि प्रत्येक पंधरवड्याला त्याबाबतच्या स्थितीची माहिती आपल्याला देण्याचे निर्देश दिले. या परिवर्तन प्रक्रियेला सहकार्य न करणाऱ्या किंवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. एफसीआय(FCI) मधील भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणांविरुद्ध सुरू असलेल्या तपासाबाबत, गोयल यांनी सांगितले की, संस्थेसाठी हा एक सावधानतेचा इशारा देणारा काळ आहे आणि भ्रष्ट व्यवहारात गुंतलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, एफसीआय(FCI) भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुता(झिरो टॉलरन्स) या तत्त्वाचे पालन करेल.

यावेळी गोयल यांनी सचिवांना संस्थात्मक यंत्रणा तयार करण्याचे निर्देश दिले ज्यामध्ये व्हिसलब्लोअर्सना म्हणजेच भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीला आणणाऱ्या जागल्यांना पुरस्कृत करता येऊ शकेल. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी एफसीआयच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले. “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने” (PMGKAY) अंतर्गत अन्नधान्याचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, विशेषत: महामारीच्या काळात, एफसीआय(FCI) ने जगातील सर्वात मोठी अन्न पुरवठा साखळी प्रणाली ज्याप्रमाणे राबवली त्याबाबत गोयल यांनी एफसीआयचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, कोविड महामारी असूनही देशात कोणीही उपाशी झोपला नाही. अन्न सुरक्षा, आर्थिक परिस्थिती मजबूत करणे, महागाई नियंत्रित करणे आणि इतर क्षेत्रात भारताने जगासमोर उदाहरण ठेवले आहे, असेही त्याने सांगितले. गोयल यांनी नमूद केले की, या वर्षातील तांदूळ खरेदीचे आकडे चांगले आहेत आणि येत्या हंगामातही चांगल्या गहू खरेदीची अपेक्षा आहे.


Previous Post

India Darpan live news updates

Next Post

धावपट्टीवरच विमान कोसळले; ४५हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, विमानतळ बंद (Video)

Next Post

धावपट्टीवरच विमान कोसळले; ४५हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, विमानतळ बंद (Video)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group