नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या २१ मे रोजी होऊ घातलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET PG 2022) स्थगित होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात वेगवागन घडामोडी होत आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात आज किंवा उद्योग ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. आता त्यात आणखीनच वाढ झाली आहे. येथील जंतर मंतर येथे NEET PG चे इच्छुक जमलेले आहे. त्यातच आता देशातील खासगी डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहीले आहे. त्यात त्यांनी नीटची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. नीट परीक्षा येत्या २१ मे रोजी होणार आहे. नीट परीक्षेच्या समुपदेशनाला उशीर झाल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. यासोबत ते म्हणत आहे की, परीक्षेच्या तयारीसाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाहीय.
आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात IMA ने म्हटले आहे की, केंद्राला नीट परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम मुदतीच्या विलंबाचा विचार करण्यात यावा. नीट परीक्षा ५ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आणि सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आली. त्यानंतर, ओबीसी आरक्षणाच्या निकषांवरून वाद झाल्यामुळे पीजी प्रवेशासाठीचे समुपदेशन जानेवारी २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आले. बहुतेक राज्यांसाठी काही रिक्त पदांसाठी समुपदेशन मेच्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. समुपदेशन आणि नवीन परीक्षेच्या तारखेमध्ये प्रत्यक्षात खूप कमी वेळ जाईल. जर उमेदवार जागा मिळवण्यात अपयशी ठरला, तर त्यांना नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि बसण्यासाठी सुमारे एक आठवडा लागेल.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनीही विनंती केली आहे की, आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे. तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष असलेल्या डीएमकेनेही नीट परीक्षेच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केले आहे. त्यात आता आयएमएनेही मागणी केली आहे. त्याचा गांभिर्याने सरकारला विचार करावा लागणार आहे.
https://twitter.com/IMAIndiaOrg/status/1524568907658719232?s=20&t=5d0Qq-5EutrAfvO28HLoyQ