नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा मतदारसंघ निहाय संवाद यात्रा सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा नाशिक दौरा कालपासून सुरू झाला आहे. काल दिवसभरात येवला, निफाड या मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर पाटील हे नाशकात आले आहेत. आज ते नाशिक, दिंडोरी, कळवण, बागलाण आणि मालेगाव मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
https://twitter.com/NCPspeaks/status/1444135045304700931