India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘राष्ट्रवादी’च्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण; भाजपाची जोरदार टीका

India Darpan by India Darpan
October 4, 2022
in राज्य
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याने त्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील सरस्वती पूजन हे मनापासून झाले की, संपूर्ण राज्यातील हिंदू समाजाने टीका केल्यामुळे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या सरस्वती पूजनाविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील सवाल केला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचे अनेक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत घडले आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ सामील झाले आहेत. त्यांनी अनेकदा ओवैसीसारखी भूमिका स्वीकारली आहे. ज्या सरस्वती मातेचे पूजन करून आपण सर्वांनी शिक्षणाचे धडे घेतले तिच्या अस्तित्वाबद्दल छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यभरातील हिंदू समाजाने छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर त्या पक्षाला सरस्वती पूजनाचे शहाणपण सुचले आहे. जनतेचा दबाव वाढला म्हणून ही पूजा केली की, मनात सरस्वतीला स्थान आहे, म्हणून राष्ट्रवादीने पूजा केली हे पहावे लागेल.

त्यांनी सांगितले की, राज्यातील सात कोटी रेशनकार्डधारकांना दिवाळीसाठी प्रत्येकी शंभर रुपयात रवा, डाळ, साखर व तेलाचे पॅकेज देण्याचा भाजपा – शिवसेना सरकारचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्याबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. सरकार हा निर्णय चांगल्या रितीने अंमलात आणेल. तसेच तो लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी पक्ष संघटना काम करेल.

"मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
देव अशानं, भेटायचा नाही रे।
देव बाजारचा भाजीपाला नाही रे।।" असा राष्ट्रवादीचा प्रकार आहे.

भुजबळांनी सरस्वतीचा फोटो नको म्हटल्यानंतर समाजात टीका झाल्यावर शहाणपण सुचले.

ओवैसीच्या मार्गाने गेले की असेच धक्के बसणार.

विचार करा पवारसाहेब. pic.twitter.com/wkp0YjQ1ol

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 4, 2022

NCP Office Saraswati Pujan BJP Criticism


Previous Post

ठाकरे आणि शिंदे गटाकडून उद्या जबरदस्त शक्तीप्रदर्शन; मुंबईत येणार १० हजार वाहने, शिंदे गटाकडून १० कोटींचा खर्च

Next Post

नाशिकमध्ये एजंटांचा सुळसुळाट! बांधकाम परवानगी आणून देण्यासाठी तब्बल ३० हजाराची लाच मागितली, एजंटला रंगेहाथ पकडले

Next Post

नाशिकमध्ये एजंटांचा सुळसुळाट! बांधकाम परवानगी आणून देण्यासाठी तब्बल ३० हजाराची लाच मागितली, एजंटला रंगेहाथ पकडले

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

बँकेचा चेक देताना चार वेळा विचार करा! बाऊन्स झाला तर आता होणार ही कठोर कारवाई

January 28, 2023

गर्लफ्रेंडने तुडवले, कंपनीनेही दूर लोटले! ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची जगभरात जोरदार चर्चा

January 28, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group