मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रवक्ते नवाब मलिक यांनी नव्या वर्षाच्या प्रारंभीच पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कारभारावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप जारी केली. त्याद्वारे त्यांनी एनसीबीवर अतिशय गंभीर आरोप केले. पंचांवर दबाव टाकून त्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आली. एनसीबीचा कारभार अतिशय संशयास्पद आहे. कुठलाही गुन्हा न केलेल्यांना अडकवण्याचे कारस्थान एनसीबी करीत आहे, असेही मलिक म्हणाले. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्याच पदावर रहावे यासाठी भाजपचा एक नेता मोठे लॉबिंग करीत असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. बघा त्यांची ही संपूर्ण पत्रकार परिषद
https://twitter.com/nawabmalikncp/status/1477515886378422273?s=20