मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या भेटी () घेत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. रोहित पवार यांनीच या भेटीचे दोन फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे
रोहित पवार हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सख्खे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे नातू असून राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. त्याचे शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबई येथे झाले. बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, पुढे बारावीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतले, तर व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले.
काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या कर्जत येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणले होते. मात्र शिंदे फडणवीस सरकारने आमदार रोहित पवारांना झटका देत मतदार संघात मंजूर झालेले दिवाणी न्यायालयाची मंजुरी स्थगित केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट करत राज्य सरकारवर टीका केली. तसेच स्थगिती उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. माझ्या कामाचे श्रेय तुम्ही घ्या पण दिवाणी न्यायालय करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1552323647552991232?s=20&t=GlFd0aYOYfh3JhD05xtgTQ
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहे. मतदारसंघासह विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याचं रोहित पवार यांनी म्हटले आहे मतदारसंघासह विविध विषयांवर मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.
यापूर्वी एका कार्यक्रमात रोहित पवार यांनी येत्या तीन महिन्यांत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तसेच २०२४ ला आपल्या विचारांचे सरकार आणायचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. तसेच यापुर्वी रोहित पवार यांची फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची ‘तारीख पे तारीख’ या त्रासातून सुटका व्हावी आणि वकिलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन महाविकास आघाडी सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली, असे त्यांनी सांगितले.
NCP MLA Rohit Pawar Meet Chief Minister Eknath Shinde Politics