India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भारतीय हवाई दल प्रमुख नाशकात; पदभार घेतल्यानंतर प्रथमच दोन दिवसीय दौरा

India Darpan by India Darpan
July 28, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) भारतीय हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल वी आर चौधरी यांनी ओझर हवाई दल केंद्राला भेट दिली. ते दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले. भारतीय वायुसेना अध्‍यक्ष पदाचा कार्यभार ३० सप्‍टेंबर रोजी घेतल्‍यानंतरचा त्‍यांचा हा प्रथमच नाशिक दौरा आहे. वायुसेना संगिनी कल्‍याण संगठन अध्‍यक्षा श्रीमती नीता चौधरी या सुद्धा त्‍यांच्‍याबरोबर होत्‍या. वायुसेना स्‍टेशन ओझरचे प्रमुख एयर कमोडोर राकेश कुमार खजांची आणि स्‍थानीय वायुसेना संगिनी कल्‍याण संगठन च्‍या अध्‍यक्षा श्रीमती ज्‍योति खजांची यांनी त्‍यांचे स्‍वागत केले.

एयर चीफ मार्शल वी आर चौधरी यांनी यावेळी वायुसेनेच्‍या सर्व कर्मचा-यांना भारत सरकार द्वारा निर्मित ‘अग्निवीर’हया उत्‍कृष्‍ट योजने संबंधात स्‍पष्‍ट करतांना सांगितले की, या योजने मुळे भारतीय वायुसेनेत नवचैतन्‍य येऊन तांत्रिक दृष्‍टया ती समृध्‍द होईल. स्‍टेशन मधील कर्मचा-यांची उच्‍च कर्तव्‍य दक्षता, सर्वोत्‍तम कार्य परिवेश तसेच उच्‍च मनोबलाची प्रशंसा केली.

या दौ-यामध्‍ये त्‍यांनी स्‍टेशन मध्‍ये सुरू असलेल्‍या सुखोई 30, एएसडी 29 वायुयान संबंधात विभिन्‍न परियोजनांची माहिती करून घेतली. देखभाल दुरूस्‍ती कार्यामध्‍ये स्टेशनने अग्रस्‍थानी राहुन स्‍क्‍वाड्न संचालन करिता सहायता मिळवून दिल्‍याबददल त्‍यांनी सर्वांचे कौतुक केले. एयर चीफ मार्शलांनी विनिर्माण सुविधांशी संबंधित अशा1 सीआईएमडी तसेच अन्‍य महत्‍वपूर्ण विभागांचाही दौरा केला. आत्‍मनिर्भर भारत मिशन अंतर्गत कार्य करण्यासाठी सर्वांना त्यांनी प्रोत्साहित केले तसेच आत्‍मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी सर्वांना त्यांनी प्रोत्‍साहित करून सर्व जवानांना तसेच त्‍यांच्‍या परिवाराच्या उज्‍ज्‍वल भविष्‍याची कामना केली.

श्रीमती नीता चौधरी वायुसेना संगिनी कल्‍याण संगठन अध्‍यक्षा यांनी देखील जवानांसाठी व त्‍यांच्‍या परिवारा साठी स्‍थानीय वायुसेना संगिनी कल्‍याण संगठन द्वारा निर्मित व सुरू असलेल्‍या विभिन्‍न कल्‍याणकारी योजनांची पाहनी केली तसेच वायु संगिनींच्‍या कार्यकारी समिति बरोबर बैठकीचे आयोजन करून विविध कल्‍याणकारी विषयांवर चर्चा केली.

Indian Air force Chief Chaudhari Nashik Visit


Previous Post

ज्येष्ठ रंगकर्मी व लेखक सदानंद देशपांडे यांच्या ‘मला भावलेली माणसं’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन

Next Post

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट; काय झाली चर्चा?

Next Post

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट; काय झाली चर्चा?

ताज्या बातम्या

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023

…तर व्हॉट्सअॅपच्या वापरावर येणार मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

February 3, 2023

ठाकरे गटाच्या नेत्यांना थेट आयफोन वापरण्याचा सल्ला; पण का? त्याने काय होणार?

February 3, 2023

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना, तत्काळ येथे पाठवा

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group