नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात भुजबळ सक्रीय होते. त्यानंतर त्यांना ताप व अन्य लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यानी कोरोनाची चाचणी केली. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी उपचार सुरू केले आहेत.
https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1640611968708124673?s=20
भुजबळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीही ते कोरोना बाधित झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी उपचार घेतले आणि त्यांनी कोरोनावर मात केली. आता पुन्हा भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिक कामात सक्रीय होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला होता.
https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1640606442360307712?s=20
https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1640258061708435457?s=20
NCP Leader Chhagan Bhujbal Corona Positive