कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर ईडीने आणि आयकर विभागाने छापे टाकून राजकीय वर्तुळात भूकंप घडवला आहे. मुळात मुश्रीफ यांच्यावर कधीनाकधी चौकशीची वेळ येणार, हे सर्वांनाच माहिती होते, पण अचानक एका पहाटेच त्यांच्यावर हे संकट ओढवणार याचा अंदाज कुणालाही नव्हता. खरं तर मुश्रीफ यांच्या नावावर असलेली कोटींची संपत्तीच त्यांच्यासाठी काटेरी ठरली आहे, असे बोलले जात आहे.
हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान नेते. पक्षाचे राष्ट्रीय नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम. म्हणूनच आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे मंत्रीपदही होतं. अश्यात अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणात मुश्रीफ यांच्या घरावर छापे मारून ईडी व आयकर विभागाने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये धडकी भरवली आहे. पण आता हे प्रकरण तर पुढे सुरू राहणार आणि आणखी इंटरेस्टींग माहिती पुढे येत राहणार आहेच. पण सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे ती मुश्रीफ यांच्या संपत्तीची. ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफ यांच्या संपत्तीची चर्चा सुरू झाली. मुळात ही माहिती निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात नमूद असल्यामुळे ती अधिकृत मानली जात आहे. त्यातून हसन मुश्रीफ यांच्या नावे व्यक्तिशः दहा कोटींची मालमत्ता असल्याचे स्पष्ट होते. पण मुश्रीफ व त्यांच्या पत्नी असे दोघांच्या नावाने असलेली संपत्ती त्याहून जास्त असल्याचे दिसत आहे. कागल, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई अश्या तीन ठिकाणांवरील ही संपत्ती आहे.
एवढी आहे संपत्ती
मुश्रीफ व त्यांच्या पत्नीच्या नावावर कागल व कारनूर येथे एकूण ३ कोटी १४ लाखांच्या शेतजमीन आहे. कागल परिसरातच मुश्रीफ यांच्या नावाने ४९ लाखांची व्यावसायिक मालमत्ता आहे, व पत्नीच्या नावावर पुणे येथे एक कोटीची व्यावसायिक मालमत्ता आहे. दोघांच्याही नावावर एकूण २१ लाख रुपयांचे दागीणे आहेत. मुश्रीफ यांनी शेअर्समध्ये ६ लाख तर एलआयसीमध्ये साडेनऊ लाखांची गुंतवणुक केली आहे. कागल व अंधेरी येथे एकूण १ कोटी ४५ लाख किमतीचे फ्लॅट्स आहेत.
१०५ कोटींच्या मालक
मुश्रीफ यांच्या पत्नींच्या नावाने चार निवासी गाळे आहेत. त्यातील एक कागलमध्ये व तीन कोल्हापुरात आहेत. या सर्वांची किंमत १०५ कोटी एवढी आहे. तर त्यांच्यावर ७४ लाख रुपयांचं कर्ज असल्याचंही म्हटलं आहे.
NCP Ex Minister Hasan Mushrif Property Wealth