मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना सध्या तरी अटक झालेली नाही. उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. मात्र त्यांच्यात आणि शाहरुख खान यांच्यात झालेल्या चॅटिंगचा मुद्दा आता चांगलाच गाजत आहे. त्यामुळे वानखेडेंना फायदा होणार की त्यांचे नुकसान होणार, हे सुनावणीनंतरच कळणार आहे.
समीर वानखेडे यांनी आर्यनला अटक केल्यानंतर त्यांच्यात व शाहरुख खान याच्यात चॅटिंग झाले होते. या चॅटिंगचा तपशील दोन दिवसांपूर्वी संपूर्ण देशापुढे आला. यात शाहरुख खान एक बाप म्हणून समीर वानखेडे यांना मुलाला चांगली वागणूक देण्याची विनंती करतोय. शिवाय आर्यनच्या आयुष्यातील हा खूप मोठा धडा असल्याचेही शाहरुखने यात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांबद्दल कमालीचा आदर आहे, असेही तो या चॅटिंगमध्ये म्हणतो. त्यावर समीर वानखेडे यांनी फार मोजक्या शब्दांमध्ये रिप्लाय दिला होता. परंतु, या चॅटिंगमध्ये त्यांनी आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे कुठेही नाही.
गुन्हे दाखल आहेत, हे माहिती असतानाही या प्रकरणात त्यांनी खासगी पंच म्हणून किरण गोसावीची नेमणुक का केली, या अनुषंगाने सीबीआय वानखेडे यांची चौकशी करीत आहे. पण शाहरुखसोबत चॅटिंगचा विषय थेट न्यायालयातच माहिती पडल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी म्हटले आहे. मुळात स्वतः वानखेडे एनसीबीचे विभागीय संचालक होते. त्यांची टीम घेऊन ते कार्डिलिया क्रुजवर गेले.
तिथे कारवाई केली आणि आर्यन खानला अटक केली. पण त्यानंतर जे काही घडले त्यात कुठेही शाहरुखसोबत चॅटिंग झाल्याची माहिती एनसीबीतील अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना नव्हती. ही माहिती वानखेडे यांनी थेट न्यायालयातच दिली, असे एनसीबीच्या सूत्रांनी म्हटले आहे. परिणामी, एनसीबीला अंधारात ठेवल्याप्रकरणी आता एनसीबीकडूनही वानखेडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हायकोर्टाचा दिलासा
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडेने शाहरुख खानसोबत केलेल्या कथित गप्पा समोर आल्या आहेत. आणि आर्यन खान प्रकरणात मुंबई कोर्टाने सीबीआयला 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे.
जूनमध्ये सुनावणी
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेवर आरोप आहेत. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. क्रूझमध्ये ड्रग्जचा समावेश असलेल्या आर्यन खान प्रकरणात मुंबई न्यायालयाने सीबीआयला ३ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जून रोजी असून तोपर्यंत न्यायालयाने समीर वानखेडेला अंतरिम दिलासा दिला आहे.
धमक्या, अश्लील मेसेज
आणि नुकतेच समीर वानखेडे यांनी स्वत: सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या पत्नीला आणि त्यांना धमक्या येत आहेत. याप्रकरणी वानखेडे म्हणाले, ‘मला आणि माझी पत्नी क्रांती रेडकर यांना गेल्या चार दिवसांपासून धमक्या येत असून सोशल मीडियावर अश्लील मेसेज येत आहेत. याबाबत मी आज मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून विशेष संरक्षणाची मागणी करणार आहे.
कोर्टाने बजावले
यापूर्वी समीर वानखेडे यांनी चॅट जोडले होते, तेव्हा न्यायालयाने याचिकाकर्ते एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांना सांगितले होते की, या काळात समीर वानखेडे मीडियाशी बोलू शकत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे शेअर करू शकत नाहीत. प्रसारमाध्यमांसह, किंवा कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करू शकत नाही. सीबीआय जेव्हा समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावेल तेव्हा त्यांना तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागेल, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
NCB Sameer Wankhede CBI Investigation