मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे महाविकास आघाडीला मोठी चपराक मिळाल्याचे भाजपे म्हटले आहे. मात्र, यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रीया दिली आहे. अकोला आणि नागपूर या दोन्ही जागांवरील मतदार हे लोकप्रतिनिधी होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले उमेदवार मतदान करतात. या निवडणुकीत पैशाचा वापर करुन घोडेबाजार झाला आहे. निकालच ते सांगत आहे, असा टोला मलिक यांनी भाजपला लगावला आहे. बघा मलिक यांची संपूर्ण प्रतिक्रीया
अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा भाजपाच्या बाजूने गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेले उमेदवार या निवडणुकीत मतदान करतात. यामध्ये पैशाचा वापर करून घोडेबाजार झाला आहे हे स्पष्ट आहे, असा आरोप राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी केला आहे. pic.twitter.com/wbq5RatKMP
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 14, 2021