नाशिक : सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षपदी प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंट प्रफुल बरडिया यांची २०२२-२३ करिता नुकतीच निवड झाली. तर सचिवपदी प्रख्यात व्यावसायिक ओमप्रकाश रावत आणि उपाध्यक्षपदी शशिकांत पारख यांची निवड झाली.नाशिकच्या सर्वात जुन्या म्हणजे मागील ७७ वर्षांपासून सामाजिक, वैद्यकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात सेवा देणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकचे जनमानसात मानाचे स्थान आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, आदिवासी आणि दुर्गम भागात मूलभूत गरजा, रुग्ण साहित्य सेवा अशा विविध क्षेत्रात ही संस्था भरीव कार्य करीत आहे.
रोटरी वर्ष २०२२-२३ करिता नव्याने निवड झालेले अन्य संचालक मंडळ पुढीलप्रमाणे – खजिनदार म्हणून चार्टर्ड अकाउंटंट संदीप खंडेलवाल, मंगेश अपशंकर, ऋषिकेश सम्मनवार, गौरव सामनेरकर, कमलाकर टाक, राज तलरेजा, हेमराज राजपूत, सुधीर जोशी, संतोष साबळे, निलेश सोनजे, सौ. शिल्पा पारख, सौ. उर्मी दिनानी, सौ. कीर्ती टाक, सौ. सुचेता महादेवकर, तेजपाल बोरा, डॉ. रामनाथ जगताप, चार्टर्ड अकाउंटंट नितीन ब्रम्हा, सागर भदाणे, सतिष मंडोरा, सौ. दमयंती बरडिया, ग्रुप कॅप्टन विनायक देवधर, प्रणव गाडगीळ, आणि अजय नरकेसरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक रोटरी चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी चार्टर्ड अकाउंटंट उदयराज पटवर्धन यांची फेरनिवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष अनिल सुकेणकर, दिलीपसिंग बेनिवाल, किशोर थेटे यांनी काम पाहिले.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. श्रिया कुलकर्णी आणि सचिव मंगेश अपशंकर यांनी सर्वांचे रोटरी सभासदांच्या वतीने अभिनंदन केले. माजी अध्यक्षा सौ. मुग्धा लेले, अॅड. मनिष चिंधडे, विजय दिनानी, रवी महादेवकर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.