नवरात्रातील देवी ललिता पंचमी व्रत महात्म्य
– पंडित दिनेश पंत
नवरात्रात पाचव्या दिवशी अर्थात अश्विन शुद्ध पंचमीला उपांग देवी माता ललिता व्रत केले जाते. यंदा हे देवी ललिता पंचमी व्रत शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी येत आहे. देवी ललिता माता ही सरस्वतीचे रूप असून मूळ रूप देवी पार्वतीचे असते, अशी मान्यता आहे. देवी ललिता मातेला स्कंदमाता म्हणूनही देखील ओळखले जाते. या दिवशी मुख्यतः शंकर-पार्वती चे पूजन केले जाते.
देवी ललिता स्वरूपातील पार्वती मातेला दुर्वांचा हार, लाल फुल, लाल वस्त्र अर्पण करावे. देवी ललिता सहस्रनाम सोबत कुंकुमार्चन करावे. सकाळ-सायंकाळ देवीची आरती करून महानैवेद्य दाखवला जातो. नवरात्रात पूजन केल्या जाणाऱ्या देवीच्या नऊ रूपांपैकी पाचव्या दिवशीचे रूप देवी ललिता आहे. ही देवी दशविद्यांची जननी आहे, अशी मान्यता आहे. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात. देवी ललिता माता हे विद्यादेवी सरस्वतीचे देखील रूप असल्याने या दिवशी सरस्वती पूजनाला विशेष महत्त्व असते. या दिवशी विशेष करून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत करणे, त्याचप्रमाणे अन्नदान, फलदान यास देखील महत्त्व आहे.
Navaratri Festival Lalita Panchami Importance