बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नवले पुलावर प्रवाशांसाठी उभारणार स्कायवॉक; रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय

by India Darpan
नोव्हेंबर 26, 2022 | 12:13 pm
in राज्य
0
3 750x375 1

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्याठिकाणी भविष्यात अपघात टाळण्याच्या दृष्टीने त्वरित आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन विश्रामगृह पुणे येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, या महामार्गावर उतार येण्याआधी वाहनचालकांना सावध करण्यासाठी रस्त्यावर फलक लावणे आवश्यक आहे. रस्त्यावरील चेक पोस्टवर सूचना देण्याची व्यवस्था करण्यात यावी. मोठ्या आणि लहान वाहनांसाठी रस्त्यावर वेगवेगळे मार्ग असावेत त्यासाठी ट्रक, कार इत्यादी वाहनांचे चिन्हे, फलक लावावेत.

लोकसंख्येबरोबरच वाहतूक वाढत असल्याने त्यादृष्टीने भविष्यातील आवश्यक नियोजन करावे. हद्दींचा प्रश्न उपस्थित न करता सर्व विभागांनी समन्वयाने कामे मार्गी लावावीत. आधीच्या आराखड्यातील मंजूर कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. नवले पुलावर प्रवाशांसाठी स्काय वॉक उभारण्यात यावे. रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

बैठकीस आमदार भीमराव तापकीर, संग्राम थोपटे, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, सेव्ह लाईफ फाउंडेशनचे रोशन जोश आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस तसेच पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात झालेल्या अपघातांचा व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना व त्यानंतर अपघात प्रमाणात झालेली घट याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २०१८ ते २०२२ या कालावधीत या महामार्गावर झालेल्या अपघातांची व केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सेव्ह लाईफ फाउंडेशनचे रोशन जोश यांनी यावेळी रस्ता सुरक्षा विषयी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीस पिंपरी-चिंचवड मनपा, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पीएमपीएमएल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग, परिवहन महामंडळ तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Navale Bridge Skywalk Road Safety Meeting
Pune Accident Traffic

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोल्हापुरात होणार पंचभौतिक महोत्सव; ५०० एकरात येणार ३० लाख नागरिक

Next Post

शाही विवाह सोहळा… २ लाख लग्नपत्रिका… हजारो चौफुट शामियाना… एकावेळी ५ हजारांची पंगत… आणि बरंच काही…

India Darpan

Next Post
Shamiyana

शाही विवाह सोहळा... २ लाख लग्नपत्रिका... हजारो चौफुट शामियाना... एकावेळी ५ हजारांची पंगत... आणि बरंच काही...

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011