India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कौमार्य चाचणीबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दिला हा ऐतिहासिक निर्णय

India Darpan by India Darpan
July 26, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही समाजात जातपंचायतच्या पंचासमोर कौमार्य परीक्षा घेतली जाते. न्यायालय काही प्रकरणात कौमार्य चाचणीचा निर्णय देत असते.वैद्यकीय आल्यासक्रमात त्याचा उल्लेखही आहे. मात्र आता देशातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना कौमार्य चाचणी कशी अवैज्ञानिक ,अमानवी व भेदभाव करणारी आहे, असे शिकविले जाणार आहे.इतकेच नाही तर न्यायालयालाही ते पटवून दिले जाणार आहे. नुकताच हा ऐतिहासिक निर्णय झाल्याचे कौमार्य चाचणी विरोधी लढणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त कृष्णा चांदगुडे यांनी ही माहिती दिली.

आयोगाकडे या विषयी समितीने पाठपुरावा केला होता. सेवाग्रामचे न्यायवैद्यकशास्त्रतज्ञ डाॅ इंद्रजीत खांडेकर यांनी या कामात मोठा पुढाकार घेतला आहे. देशातील न्यायालये वैवाहिक,बलात्कार व नपुसकत्व प्रकरणात महिला कुमारी आहे किंवा नाही हे जाणुन घेण्याचे निर्देश डाॅक्टरांना देत असतात. न्यायवैद्यकशास्त्रात या कौमार्य चाचणीचा उल्लेख आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा उल्लेख काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता परंतु महाराष्ट्राच्या बाहेर देशभर ते शिकविले जात होते.

मद्रास उच्च न्यायालयाने वैद्यकीय आल्यासक्रमातील समलिंगी, .ट्रान्सजेंडर यांच्या समस्स्यांसंदर्भात एक समिती समिती स्थापन करण्यास सांगितले होते.वैद्यकीय आयोगाच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा अरुणा वाणीकर यांनी तज्ञ समितीची स्थापन केली होती.या समितीत दिल्लीचे डाॅ. विरेंद्र कुमार,बंगलोरच्या डाॅ प्रभा चंद्रा,एम्स गोरखपुरच्या सुरेखा किशोर आणि सेवाग्रामचे न्यायवैद्यकशास्त्रतज्ञ डाॅ इंद्रजीत खांडेकर हे सहभागी होते.

डाॅ इंद्रजीत खांडेकर यांच्या विनंतीवरून कौमार्य विषय सुद्धा समितीच्या कार्यकक्षेत टाकण्यात आला. तेंव्हा कौमार्य चाचणी अवैज्ञानिक असल्याचा निर्णय या समितीने घेतला. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रथमच हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.वैद्यकीय आल्यासक्रमात विद्यार्थ्यांना याबाबत सकारात्मक शिकविले जाणार आहे.

बरीच भारतीय न्यायालये ही कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे याबद्दल अनभिज्ञ असतात.त्यामुळे न्यायालयाने जर एखादी कौमार्य चाचणी करण्याचे आदेश डाॅक्टरांना दिल्यास ती कशी अवैज्ञानिक आहे,हे समजुन सांगण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण होणार आहे.न्यायवैद्यकशास्त्रातील ही अशी पहिलीच वेळ आहे.

काय आहे कौमार्य चाचणी?
जेंव्हा जेंव्हा न्यायालये डाॅक्टरांना एखादी स्त्री कुमारी आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी अथवा एखाद्या प्रकरणात कौमार्य चाचणी घेण्याचे आदेश देतात,तेंव्हा डॉक्टर तिच्या कौमार्यपटलचा रक्तस्त्राव, त्याच्या छिद्राचा आकार तसेच योनीमार्गाची शिथिलता याचा आभ्यास करतात.या प्रकाराला कौमार्य चाचणी म्हणतात.या तथाकथित कौमार्य चाचणीला कोणताही वैद्यकीय आधार नाही.पण हे न्यायालयाला कसे समजुन सांगावे ,हे सध्या डाॅक्टरांना शिकविले जात नाही.न्यायालयाच्या आदेशानुसार डाॅक्टर अशी तपासणी करतात परंतु त्यामुळे न्यायादानात गफलत होते.त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना कौमार्य चाचणी अवैज्ञानिक कशी व न्यायालयाला ती कशी समजुन सांगावी,या बद्दलचे शिक्षण देण्यात येणार आहेत.

” मुळात एखादी स्त्री कुमारी आहे अथवा नाही, हे जाणून घेण्याचा आधिकार कुणालाच नाही. आम्ही जात पंचायत मार्फत चालणाऱ्या कौमार्य चाचणी विरोधात लढत आहे.वैद्यकीय शास्त्रातील कौमार्य चाचणीच्या उल्लेखामुळे लढ्याला मजबुती येत नव्हती. पण या निर्णयामुळे लढा मजबुत होईल,असा आशावाद आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे अंनिस स्वागत करत आहे.”
-कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस.

National Medical Council Big Decision On Virginity Test Anis Superstition Women Girl Jat Panchayat


Previous Post

लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील आँपरेशन थिएटर दोन महींन्यापासून बंद ( व्हिडिओ)

Next Post

उद्धव ठाकरेंची मुलाखतः नेमकं काय चुकलं? शिवसेना का फुटली? मविआचा प्रयोग फसला का? जाणून घ्या सविस्तर…

Next Post

उद्धव ठाकरेंची मुलाखतः नेमकं काय चुकलं? शिवसेना का फुटली? मविआचा प्रयोग फसला का? जाणून घ्या सविस्तर...

ताज्या बातम्या

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group