शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये आजपासून राष्ट्रीय ब्रीज स्पर्धा…भारतीय संघाची होणार निवड

by Gautam Sancheti
मे 29, 2025 | 7:26 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 57

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनआणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नाशिकमध्ये २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या ” तोलानी चषक ” राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तोलानी शिपिंग कंपनी यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या गंगापूर रोड, सोमेश्वर मंदिरजवळील गुप्ता गार्डन येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन नाशिक ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष तथा ब्रीज या खेळाच्या प्रचार-प्रसार यासाठी कायमच कार्यरत असणाऱ्या मित्र विहार स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या अध्यक्षतेखाली

ब्रीजच्या ज्युनियर डेव्हलपमेंट कमिटीच्या चेअरमन अशोक भावनांनी आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख, खजिनदार प्रसाद होनप यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू तथा संघटक आणि भारतीय ब्रीज फेडेरेशनचे उपाध्यक्ष तथा ज्युनियर खेळाडूंच्या डेव्हलपमेंट कमिटीचे सचिव आनंद सामंत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल पाध्ये, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव तथा या स्पर्धेचे आयोजन प्रमुख हेमंत पांडे, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन उकिडवे, सचिव अतूल दशपुत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेची तांत्रिक बाजू स्पर्धा संचाकल के. एस. स्वामिनाथन सांभाळणार आहेत.

या स्पर्धेमध्ये भारताच्या १५ विविध राज्यांच्या ९० खेळाडूंनी सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला आहे. आंतरराष्ट्रीय ब्रीज फेडेरेशन यांच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१ वर्षे मुले आणि मुली या चार वयोगटाचा या स्पर्धेमध्ये समावेश असणार आहे. या स्पर्धेमध्ये टीम चॅम्पिअनशिप, आणि पेअर्स प्रकार अश्या विविध प्रकारात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये सन २०२१ आणि सन २०२२ या वर्षी जागतिक ब्रीज चॅम्पिअनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदके मिळविणाऱ्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये चांगलीच चुरस दिसून येणार आहे.

भारतीय संघांची निवड – या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची भारताच्या संघासाठी निवड होणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक ११ ते १७ जुलै, २०२५ दरम्यान इटली येथील सोल्सोमाज ओरे शहरात आयोजित जागितिक ब्रीज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती या स्पर्धेचे आयोजन प्रमुख तथा महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे यांनी दिली.

National Bridge Competition to begin in Nashik from today

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी करा नवीन अर्ज…या अटी रद्द

Next Post

दोन कारवायांमध्ये २३.५ कोटी रुपयांचे हेरॉईन आणि मेथाम्फेटामाइन जप्त…चार जणांना अटक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 58

दोन कारवायांमध्ये २३.५ कोटी रुपयांचे हेरॉईन आणि मेथाम्फेटामाइन जप्त…चार जणांना अटक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011