नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशाच्या ईशान्येकडील भागात अमली पदार्थ आणि प्रतिबंधित औषधांच्या तस्करी विरोधात केलेल्या कारवाईचा भाग म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय), 19 बीएन आसाम रायफल्सच्या सहकार्याने 21.5.2025 रोजी मणिपूरमधील नोनी येथे एनएच-37 या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रक मधून 569 ग्रॅम हेरॉईन आणि 1,039 ग्रॅम मेथाम्फेटामाइन या बंदी घालण्यात आलेल्या औषधाच्या गोळ्या जप्त केल्या. ट्रकच्या चेसिसवर खास तयार केलेल्या पोकळीत/ चेंबरमध्ये प्रतिबंधित अमली पदार्थांची पाकिटे लपवून ठेवल्याचे आढळली.
आणखी एका कारवाईत डीआरआयने आसाम रायफल्स एफआययू युनिट सिलचरच्या सहाय्याने 22.05.2025 रोजी आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यातील अलोइचेरा येथे एका ट्रक मधून 2,640.53 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. ट्रकच्या बेडलोड फ्लोअरवर खास बांधलेल्या/तयार केलेल्या पोकळीत खोलवर अमली पदार्थांची पाकिटे लपवून ठेवली होती.
आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात सुमारे 23.5 कोटी रुपये मूल्य असलेले हे प्रतिबंधित पदार्थ एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत जप्त करण्यात आले असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
यंदाच्या जानेवारी महिन्यापासून डीआरआयने देशाच्या ईशान्य भागात केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 173 कोटी रपये किमतीचा गांजा, मेथाम्फेटामाइनच्या गोळ्या आणि हेरॉईन यासारखे प्रतिबंधित पदार्थ जप्त केले असून, 26 जणांना अटक केली आहे.
seizes heroin and methamphetamine worth around Rs. 23.5 crore