बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तब्बल ५ बँकांची २८९ कोटींची फसवणूक… सीबीआयकडून खाजगी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकाला अटक

by India Darpan
जुलै 11, 2023 | 3:05 pm
in संमिश्र वार्ता
0
fraud


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध बँकांच्या संघाशी संबंधित 289.15 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान आज सीबीआयने एका खाजगी बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना अटक केली.

नवी दिल्लीतील एका खाजगी कंपनीविरुद्ध तसेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, संचालक, हमीदार, तसेच इतर काही सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती आणि खाजगी व्यक्तींविरोधात 25 मे 2022 रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा आणि युको बँक अशा बँकांच्या संघाची सुमारे 289.15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी, मेसर्स तिरूपती इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जगमोहन गर्ग यांना अटक करण्यात आली असून त्यांना 13 जुलै 2023 पर्यन्त पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील या बँक संघाने, कर्जदार कंपनीला, 2009 ते 2014 या कालावधीत, नवी दिल्लीत पश्चिम विहार इथे एक हॉटेल आणि इतर व्यावसायिक गाळे बांधण्यासाठी 300 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. मात्र, या आरोपीने, कर्जदात्या बँक संघाला काहीही कल्पना न देता, ह्या कथित हॉटेल आणि व्यावसायिक जागांची अनेक व्यावसायिक/किरकोळ विक्रेते/कार्यालये यांना परस्पर विक्री केली, असा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच या खरेदीदारांकडून मिळालेले पैसे अन्यत्र वळवण्यात आल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी आधी 27.05.2022 रोजी आरोपीशी संबंधित विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या छाप्यादरम्यान, अशा गैरव्यवहारांशी संबंधित कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. तपासादरम्यान, सीबीआय ने अनेक साक्षीदार, बँकांचे अधिकारी, कर्जदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.अधिक माहितीसाठी, कृपया CBI वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या AC-V, CBI, दिल्लीच्या FIR/RC 2232022A0003 दिनांक 25.05.2022 मध्ये अधिक तपशील पहावेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येत्या १४ जुलैपासून असा आहे पावसाचा अंदाज…

Next Post

भारतीय स्टेट बँकेची ८० कोटींची फसवणूक… सीबीआयची मोठी कारवाई

India Darpan

Next Post
cbi

भारतीय स्टेट बँकेची ८० कोटींची फसवणूक... सीबीआयची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011