गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील या ५१ गावांचे रुपडे पालटणार… मॉडेल व्हिलेजसाठी निवड… बघा, तेथे काय काय होणार

by India Darpan
जुलै 20, 2023 | 5:18 am
in स्थानिक बातम्या
0
ZP Nashik 1 e1642158351239

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्हा परिषदेमधील सर्व पंचायत समित्यांमधून किमान ३ ग्रामपंचायतींची निवड करून सन २०२३-२४ या वर्षापासून केंद्र शासन, राज्य शासन व शासकीय सर्व विभागांच्या ग्राम विकासाशी संबंधित सर्व योजना राबवून सर्वसमावेशक विकास करण्यासाठी “आदर्श गाव योजना” सुरू करून त्याद्वारे “आदर्श ग्रामपंचायत” निर्माण करण्याबाबत या कार्यालयास निर्देश दिलेले होते. त्यानुसार योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्यानुसार “आदर्श गाव योजना” सुरू करण्याबाबत सुचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी परिपत्रकाद्वारे निर्गमित केल्या आहे.

नाशिक जिल्हा परिषदेमधील सर्व पंचायत समित्यांमधून किमान ३ ग्रामपंचायतींची निवड करून सन २०२३-२४ या वर्षापासून केंद्र शासन, राज्य शासन व शासकीय सर्व विभागांच्या ग्राम विकासाशी संबंधित सर्व योजना राबविण्याकरिता सर्वसमावेशक विकास करण्यासाठी “आदर्श गाव योजना” सुरू करण्यात येत आहे. यासाठी सन २०२३-२४ या पहिल्या वर्षाकरिता “स्मार्ट व्हिलेज योजना” आणि “आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना” यात मागील ३ वर्षातील तालुक्यात पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतींची आणि “सांसद आदर्श गाव योजना (SAGY)” मधील ५१ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

या गोष्टींची होणार प्रभावी अंमलबजावणी –
घरकुल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, गावातील सर्व शासकीय इमारतींमध्ये शौचालय बांधणे, गावाचे जल अंदाजपत्रक तयार केले जाणार, सर्व घरांना १००% नळ जोडणी, वृक्ष लागवड, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, गावात १००% पथदीप एलइडी/ सौर उर्जेवर होणार, पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार, मासिक सभा, ग्रामसभा, महिला सभा यांची प्रभावी अमलबजावणी, लसीकरण, किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण, आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग कार्ड यांचे १००% वाटप, सामाजिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी

या गावांचा समावेश –
नाशिक – दरी, मुंगसरे, कोटमगाव, गणेशगाव, माणिकखांब
इगतपुरी – शिरसाठे, मोडाळे, नागोसली
त्र्यंबकेश्वर – वेळुंजे, काचुर्ली, आंबोली, वाघेरा
पेठ – कोपुर्ली बु., शेवखंडी, बोरवठ

सुरगाणा – बुबळी, हातरुंडी, म्हैस खडक
दिंडोरी – करंजवण, कोल्हेर, गोंडेगाव
कळवण – सुळे, नांदुरी, मेहदर
बागलाण – पिंपळदरे, रातीर, नवे निरपुर

देवळा – वरवंडी, खालप, माळवाडी
चांदवड – राजदेरवाडी, हिरापुर, नन्हावे, रायपुर
मालेगाव – निळगव्हाण, बेळगाव, मुंगसे
नांदगाव – बोराळे, श्रीरामनगर, भालुर

येवला – महालखेडा, सायगाव, एरंडगाव खु
निफाड – थेरगाव, आहेरगाव, साकोरे मिग
सिन्नर – वडांगळी, चिंचोली, दातली, किर्तांगळी, ठाणगाव

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवशाही बसच्या अपघातांबाबत राज्य सरकारने दिली ही माहिती…

Next Post

राज्यभरात अशी आहे पूरस्थिती… या ठिकाणी पथके तैनात…

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

राज्यभरात अशी आहे पूरस्थिती... या ठिकाणी पथके तैनात...

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011