India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकहून येवल्याला जा आता सुन्नाट! राज्य सरकारने या प्रस्तावाला दिली मंजुरी

India Darpan by India Darpan
March 10, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हायब्रीड अॅन्युटी मॉडेल प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील नाशिक-निफाड-येवला या चौपदरी रस्त्याचे पिंपळस ते येवला दरम्यानच्या काँक्रीटीकरण करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ५६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक-निफाड-येवला रस्त्याच्या सुधारणेच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

सन २००४ साली छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून नाशिक ते येवला या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. या चौपदरी रस्त्यामुळे या मार्गाने वेगाने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना कमीत कमी वेळेत प्रवास करणे शक्य झाले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून सदर रस्त्यावर प्रचंड खड्डे निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात रस्ता नादुरुस्त झाल्याने अनेक अपघात होत होते. तसेच वाहतुकीस अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रस्त्याच्या नूतनीकरणासाठी छगन भुजबळ यांचे शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरू होता. त्यातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत या रस्त्याची सुधारणा करण्यास मंजुरी मिळाली होती.

दरम्यान सरकार बदलल्यानंतर हा प्रकल्प रेंगाळला होता. या प्रकल्पासाठी छगन भुजबळ यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यानंतर सदर प्रकल्पास पुन्हा हायब्रीड अॅन्युटी मॉडेल प्रकल्पातून सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी शासनाची मंजुरी मिळाली. त्यासाठी अर्थसंकल्पातून ५६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक – निफाड – येवला रस्ता १७९ ते २०९ किलोमीटर म्हणजे पिंपळस ते येवला या भागाचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर होऊन या रस्त्याच्या सुधारणेच्या कामाला मंजुरी मिळणार आहे.

Nashik Yeola Road Proposal Sanction Government


Previous Post

कांद्यासह शेतमालाला हमीभावासाठी चांदवडला रास्ता रोको हायवेवरील वाहतूक काही काळ ठप्प

Next Post

अररररर…! सोशल व्हायरलने उडाला गोंधळ! दहावीच्या विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला; आता काय होणार?

Next Post

अररररर...! सोशल व्हायरलने उडाला गोंधळ! दहावीच्या विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला; आता काय होणार?

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group