India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढताना महिलेसह अल्पवयीन मुलगी रंगेहाथ ताब्यात; येवला बसस्टँडवरील घटना

India Darpan by India Darpan
January 22, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून येवला शहर परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. खासकरुन बसस्टँड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ असतो. आणि आता या चोऱ्या रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढताना महिलेसह अल्पवयीन मुलीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

येवला बसस्टँडमध्ये एक महिला बसमध्ये चढत होती. त्याचवेळी या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ब्लेडच्या सहाय्याने कापण्यात आली. या महिलेच्या हाताला देखील ब्लेडने कापल्यागेले. हा प्रकार या महिलेच्या लक्षात येताच सदर महिलेने आरडाओरडा केला. तसेच,  बसस्टँडवरील प्रवाशांच्या मदतीने चोरी करणाऱ्या महिलेस तिच्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित महिलेचे नाव प्रमिला पिंट्या चव्हाण असे आहे. तिच्या ताब्यातून ४ ग्रॅम वजनाची पोत घेण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्ष सूरज मेढे यांच्या मार्गदर्शना खाली पो.ह. मधुकर गेठे करीत आहेत.

दुभत्या जनावरांच्या वाढीव दुधासाठी देण्यात येणा-या औषधांचा साठा जप्त
मालेगाव शहरातील म्हाळदे शिवारात गाय, म्हशींच्या दुध वाढीसाठी बेकायदा ऑक्सिटॉसीन औषधांची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. विशेष पथकाने छापा मारत कारखान्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी ५२ औषधांचे बॉक्स जप्त केले आहेत. याप्रकरणी मोठे रॅकेट उघडीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Nashik Yeola Crime Chain Snatching Police


Previous Post

मालेगावातील भाजपचा हा नेता ठाकरे गटात जाणार; आगामी निवडणुकीत अशी बदलणार समीकरणे

Next Post

“साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ी”वर आधारीत असा आहे महाराष्ट्राचा चित्ररथ; प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार

Next Post

“साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ी”वर आधारीत असा आहे महाराष्ट्राचा चित्ररथ; प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार

ताज्या बातम्या

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय! राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक गार्डनचे नाव बदलले

January 28, 2023

अतिशय गरीब घरातील या महिलेचा आवाज ऐका, तुम्हीही थक्क व्हाल! अभिनेता सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर (व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group