येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून येवला शहर परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. खासकरुन बसस्टँड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ असतो. आणि आता या चोऱ्या रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढताना महिलेसह अल्पवयीन मुलीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
येवला बसस्टँडमध्ये एक महिला बसमध्ये चढत होती. त्याचवेळी या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ब्लेडच्या सहाय्याने कापण्यात आली. या महिलेच्या हाताला देखील ब्लेडने कापल्यागेले. हा प्रकार या महिलेच्या लक्षात येताच सदर महिलेने आरडाओरडा केला. तसेच, बसस्टँडवरील प्रवाशांच्या मदतीने चोरी करणाऱ्या महिलेस तिच्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित महिलेचे नाव प्रमिला पिंट्या चव्हाण असे आहे. तिच्या ताब्यातून ४ ग्रॅम वजनाची पोत घेण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्ष सूरज मेढे यांच्या मार्गदर्शना खाली पो.ह. मधुकर गेठे करीत आहेत.
दुभत्या जनावरांच्या वाढीव दुधासाठी देण्यात येणा-या औषधांचा साठा जप्त
मालेगाव शहरातील म्हाळदे शिवारात गाय, म्हशींच्या दुध वाढीसाठी बेकायदा ऑक्सिटॉसीन औषधांची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. विशेष पथकाने छापा मारत कारखान्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी ५२ औषधांचे बॉक्स जप्त केले आहेत. याप्रकरणी मोठे रॅकेट उघडीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.
Nashik Yeola Crime Chain Snatching Police