नाशिकमधील बाईक रायडर सौ. दिपिका स्वानंद दुसाने यांनी नुकताच मोठा विक्रम केला आहे. त्यांनी बुलेटवर तब्बल २१ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. भारतातील विविध शहरांना त्यांनी भेटी दिल्या. ११ वर्षांची जुळी मुले, पती, सासू आणि सासरे अशा कुटुंबाची जबाबदारी असतानाही दिपिका यांनी मोठे धाडस करीत हा यशोप्रवास केला आहे. कॉमर्समधून त्यांनी पदवी संपादन केली आहे. बाईक चालवण्याची त्यांना प्रचंड आवड आहे. महिलांना बाईकिंग मध्ये सेफ व प्रोटेक्टेड वाटवे म्हणून गेल्या वर्षापासून बाईकर्णी नाशिक नावाचा लेडीज बायकर्सचा गृप सुरु केला आहे. गेल्या ३ वर्षांपासून या ग्रुपच्या माध्यमातून जनजागृतीचे मोठे कार्य केले जात आहे.
सौ दिपिका दुसाने यांनी बाईकवरुन केलेला प्रवास अतिशय खडतर आणि रोमांचक होता. याच प्रवासावर आधारीत नवी लेखमाला आता ‘इंडिया दर्पण’मध्ये सुरू होत आहे. हे प्रवास वर्णन वाचकांना खुप काही सांगून जाणार आहे. या प्रवासात आलेल्या चांगल्या, वाईट यासह आव्हानात्मक घटनांचे साक्षीदार या लेखमालेद्वारे वाचकांना होता येणार आहे. पुढील आठवड्यापासून ही मालिका ‘इंडिया दर्पण’मध्ये वाचकांच्या भेटीला येत आहे.
अधिक माहितीसाठी
सौ दिपिका स्वानंद दुसाने
इंदिरानगर, नाशिक
मो. 7972479858
Nashik Women Bike Ride Experience Article Series
Deepika Dusane Biking Travel Journey