शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हरिनामाच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी

एप्रिल 16, 2023 | 10:05 pm
in इतर
0
1681645222417 e1681662924697

 

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मुर्तींना सुगंधी चंदनाची उटी लावण्यात आली यावेळी शेकडो वारकरी भक्ती रसात तल्लीन झाले होते.

भुतलावरील सजीव सृष्टी प्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तीभावनेतुन चैत्र वद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठलरुक्मीणी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मुर्तीना चंदनाच्या उटीचे पारंपारीक पध्दतीने लेपन करण्यात येते. सुमारे दिडशे वर्षांपुर्वी एका वारकरी महिलेने हि परंपरा सुरू केली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.

आज उटीच्या वारीच्या दिवशीच श्रीसंत श्रीनिवृत्तिनाथ संस्थानचे वंशपरंपरागत पुजारी तथा विश्वस्त ह.भ.प.जयंत महाराज गोसावी यांचे वडील ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी यांचे आज ब्रह्ममुहुर्तावर दुःखद निधन झाले त्यामुळे गोसावी कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.
या निमित्त सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत गेले ७ दिवस अनेक महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणीवर चंदन घासुन उटी तयार केली. नाथांच्या समाधीची पंचोपचारे पुजा व अभिषेक संपन्न झाल्यावर दुपारी ठिक २ वाजता टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग गात संजीवन समाधी व इतर देवतांना उटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे विश्वस्त नारायण मुठाळ, श्रीपाद कुलकर्णी, मनोज कुमार राठी, राहुल साळुंके, अमर ठोंबरे, कांचन जगताप उकार्डे, गोकुळ गांगुर्डे, सोमनाथ घोटेकर, पुजारी सच्चिदानंद गोसावी, अॅड. विजय धारणे, महामण्डलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प. माधवदास राठी, भाजप जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी, वेदमुर्ती निरज शिखरे, लाला पिंपरकर, सुदाम बुवा, आदिंनी देवतांना उटी लावली. यावेळी हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणुन गेला. यानंतर देवांना नवीन पोशाख करून साजशृंगार करण्यात आला.

नाथांना मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवुन आरती करण्यात आली. नाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास पन्नास हजारांच्यावर भाविकांनी येथे हजेरी लावली. रात्री ११ वाजता समाधीची विधिवत पुजा करुन देवतांना लावलेली उटी उतरविण्यात येईल. ती टिपांमध्ये कालवुन भाविकांना प्रसादरूपी वाटण्यात येईल. भाविक ती उटी घेऊन कृतार्थ मनाने घरी परततील. या वारीसाठी अनेक दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या असुन ठिकठिकाणांहून किर्तनाचे सुर कानावर पडत आहे, तर शेकडो भाविकांनी आज ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पुर्ण केली.

यानिमित्त नाथांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पो. उप अधिक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. बिपिन शेवाळे, पो.उ.नि. अश्विनी टिळे, यलाप्पा खैरे, विजय झांजड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

Nashik Trimbakeshwar Nivruttinath Samadhi Chandan Uti

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज या व्यक्तींना येऊ शकतात अडचणी; जाणून घ्या, सोमवार, १७ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

Next Post

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे अडचणीत; न्यायालयाने काढले हे आदेश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
Shivaji Chumbhale

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे अडचणीत; न्यायालयाने काढले हे आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011