बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हरिहर गड किल्ल्याविषयी तुम्हाला हे माहित आहे का… शहाजीराजांशी असा आहे त्याचा संबंध….

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 22, 2023 | 9:42 pm
in इतर
0
P1310596 2 e1697995714771

अनोखा दुर्गाविष्कार – हरिहर

     नाशिकमधून नियमितपणे भटकणार्‍यांना त्र्यंबकेश्वराची डोंगररांग सगळ्यात जवळची. त्र्यंबक भागात ट्रेक करतांना विविध ॠतूत दरवेळी निरनिराळं निसर्गरूप अनुभवायला मिळतं. दिवसाभरात अटोपशीर भटकंती करून परतायचं तर अंजनेरी व ब्रह्मगिरीनंतर येतो तो ‘हरिहर’. फक्त नाशिककरच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि देशातून गिर्यारोहक मंडळींमध्ये हरिहर हे नाव खूप प्रसिद्ध आहे.
कुलथे e1610123297171
सुदर्शन कुलथे
गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
त्र्यंबक, भास्करगड आणि हरिहर या तिन्ही दुर्गांवर असलेल्या कातळातल्या खोदीव पायर्‍यांवरून त्यांची निर्मिती समकालीन असल्याचा तर्क लावता येतो. हे तिनही किल्ले बनण्यास सुमारे ८०० वर्षांहून अधिक काळ लोटलेला दिसून येतो. त्रिंबक किल्ल्याचा उल्लेख थेट यादवकाळापासून वाचनात येतो. इ.स. १६२६ मध्ये शहाजीराजांनी माहुली किल्ल्याला शरणागती पत्करतांना मुघल सरदार खानजमानला त्रिंबक आणि त्रिंगलवाडीबरोबर हरिहर दुर्ग दिल्याचा उल्लेख आहे. इ.स. १६८८ मध्ये औरंगजेबाचा सरदार मातबरखानाच्या पत्रातही हरिहरचा उल्लेख मिळतो. इ.स. १८१८ मध्ये इतर सर्व किल्ल्यांबरोबरच हरिहरही इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला. इतिहासाचे अनेक धागेदोरे हरिहराने आपल्या पोटात राखून ठेवलेले दिसतात.
हरिहरच्या पायथ्याला दोन गावे आहेत. उत्तरेला हर्षवाडी तर दक्षिणेला निरगुडपाडा. पायथ्याच्या या गावांना पोहोचायचं तर नाशिकहून पहिलं त्रिंबकेश्वर गाठायचं. त्रिंबकहून दोन रस्ते हरिहरकडे जातात. त्रिंबक – पेगलवाडी, पहिने, सामुंडी, टाकेहर्ष आणि निरगुडपाडा हा एक रस्ता. तर त्रिंबक – सापगाव – काचुर्ली, लेकुरवाळी आणि हर्षवाडी. पूर्वी हर्षवाडी गावापर्यंत गाडीरस्ता नव्हता तेव्हा सर्व गिर्यारोहक निरगुडपाडा येथून चढाई करत असत. परंतु पलिकडचे हर्षवाडी गाव रस्त्यांनी जोडले गेले. त्रिंबकपासून जरा कमी अंतरावर आणि निरगुडपाड्यापेक्षा कमी चढाई असल्याने आता हर्षवाडी हाच मुख्य पायथा बनलाय.

P1310500 2

अगदी ३०-३२ घरं असलेल्या हर्षवाडीतून वर जाणारी वाट कुणीही दाखवतं. पायवाट चांगली मळलेली आहे. हरिहरच्या पोटातलं जंगल तसं दाट आहे परंतु हळूहळू त्यालाही धक्का बसतोय. रमतगमत चढायचं. समुद्रसपाटीपासून हरिहरची उंची ११२० मीटर इतकी आहे. परंतु पायथ्यापासून एवढा उंच नाही. चढाई सोपी असली तरी थोडा दम लागतोच म्हणून थोडं थांबून आरामही करून घ्यायचा. मधल्या टप्प्यावरील सपाटशा जागेवरून पुन्हा वर जात आपल्याला एका जागेवर शेंदूर लावलेले अनेक दगड दिसतात. हा ‘वेताळ पायथा’ म्हणून ओळखला जातो.
इथे हल्ली स्थानिकांनी तात्पुरत्या झोपड्या उभारून चहा, पाणी, सरबताचे हॉटेल्स थाटली आहेत. या वेताळाजवळ तरूण मंडळी जोरबैठकाही काढतात, कारण अशी तिथे प्रथा आहे. या वेताळाशी आलं की, श्रावणात केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रदक्षिणेचं बरोबर निम्म अंतर संपतं. पुन्हा थोड्या उंचवट्यातून जात आपण हरिहरच्या एकदम उभ्या कातळाजवळ जाऊन पोहोचतो. गडाच्या नैऋत्येला असलेल्या या कड्याचं नांव आहे ‘स्कॉटीश कडा’.

P1070257 2

डगलस स्कॉट या ब्रिटीश गिर्यारोहकाने १९८५ साली हा कडा सर केला होता. त्यावरून पडलेलं या कड्याचं नांव. या कड्याच्या थोडं उजवीकडे बळसा घेतला की कातळावर सलग वर पर्यंत कोरलेल्या पायर्‍यांचा सरळसोट जिना दिसतो. हा सगळा एकदम अंगावर आलेला मार्ग पाहून आपण रोमांचित होतो. तशा या पायर्‍या चढायला फारशा अवघड नाहीत. हाताला धरण्यासाठी खोबण्याही बनवलेल्या आहेत. झपझप पालीसारखं वर चढायचं. हरिहरला यायचं तर या जिन्यावरून चढण्यातलं थ्रील अनुभवायलाच!
साधारण ९०-९५ पायर्‍या चढल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. अजूनही चांगल्या अवस्थेत असलेलं हे प्रवेशद्वार बघून कातळातल्या कोरीव मार्गानेच थोडं वर जात गडमाथ्यावर पाऊल ठेवायचं. गडमाथ्यावर मनसोक्त हिंडायचं. काही पाण्याची टाकी आणि तलावही लागतो. पाण्याच्या तलावा शेजारी हनुमान आणि शंकराचं ठिकाणही आहे.
तलावाशेजारून पुढे जात एका उंचवट्यासारखा टेकडीवर हरिहरचा सर्वोच्च शेंडा लांबूनच दिसतो. तिथं पोहोचायचं. ह्या शेंड्यावर झेंडा लावलेला आहे. आपण ज्या गावातून चालत आलो तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आपण तिथून आलो ! असं आश्‍चर्यभाव आपोआपच येतो. ब्रह्मगिरी, ब्रह्माडोंगर, बसगड, फणीचा डोंगर, उतवड, वैतरणा जलाशयाचं अथांग पाणी असा सगळा नजारा मनात साठवून ठेवायचा. हरिहरच्या माथ्याच्या पाठीमागच्या भागावर एक कोठारासारखी इमारत दिसते.

DSCN2582 2

इमारतीजवळच पाण्याची पाचसहा टाकी दिसतात. सगळा गडमाथा हिंडून पुन्हा प्रवेशद्वाराकडे यायचं आणि त्याच सरळ पायर्‍यांचा जिना उतरून खाली यायचं. मधल्या सपाटीवर काही अंतर गेल्यावर एक गणेशकुंड नावाची पुष्करिणी लागते. दगडी चिऱ्यांनी घडवलेल्या पुष्करिणीचा इतिहास त्यावर लावलेला पेशवेकालीन शिलालेख उलगडतो. इथेच एक छोटा आश्रमही आहे. गणेशकुंडाचा परिसर फारच सुंदर, शांत व वनराईने झाकलेला आहे.
हरिहर किल्ला निट न्याहाळला तर त्याचा आकार त्रिकोणी प्रिझमसारखा भासतो. तिन बाजू आणि तिनही कडा अगदी उभ्या आहेत. एक कडा थोड्या कोनात आहे त्यावरूनच पायर्‍यांचा सोपान कोरण्यात आला आहे. इतकी सुंदर रचना बघून कुणीही अगदी आवाक् होतच. साधारण दोनशे वर्षांपुर्वी इंग्रजांनी हा किल्ला ता़ळ्यात घेतल्यावर जेव्हा कॅप्टन ब्रिग्जने या दुर्गाला भेट दिली त्यावेळेस त्याने याचं वर्णन लिहून ठेवलंय… truely wonderful! words are not be able to give an idea of its dreadful steepness!!!!… त्यामुळेच ‘पुन्हा नक्की येऊ’ म्हणूनच हरिहरचा निरोप घ्यायचा आणि पुन्हा पुन्हा जात राहायचं.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नवरात्रोत्सव विशेष… मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी… अशी आहे या देवीची महती…

Next Post

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या सोमवार २३ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या सोमवार २३ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011