India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक भूमीअभिलेखचे आणखी दोघे आणि खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात… मागितले १० लाख… घेतले ३ लाख… असे अडकले सापळ्यात…

India Darpan by India Darpan
March 10, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीची कीड अतिशय खोलवर रुजल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जवळपास दररोज लाचखोर सापडत आहेत. भूमीअभिलेख विभागातही लाचखोरीला ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी भूमीअभिलेखच्या दोघे सापडले असताना आता पुन्हा दोघे आणि एक खासगी एजंट एसीबीच्या गळाला लागला आहे. आता त्र्यंबकेश्वर भूमीअभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचला होता.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार दौलत नथू समशेर (वय 43, रा. फ्लॅट नं 6, चैत्र चंद्र अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, गोकुळ हॉस्पिटल जवळ, नाशिक), भू करमापक भास्कर प्रकाश राऊत, (वय 56, रा. रो हाऊस नं 3, 4, रामकुंज अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, राम मंदिर जवळ, चुनचाळे शिवार, अंबड नाशिक) व वैजनाथ नाना पिंपळे, (वय 34, रा. रो हाऊस नंबर 1, ऋषिराज रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) अशी लाखोरांची नावे आहेत. या तिघांनी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडी अंती ही रक्कम ३ लाख रुपये करण्यात आली.

फायनल लेआउट मध्ये त्रुटी दाखवून शेजारील गटातील क्षेत्र आपल्या गटात सरकू देऊ नये, अशी मागणी एका व्यक्तीने केली. त्याच्या मोबदल्यात समशेर व राऊत यांनी १० लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यास ही व्यक्ती तयार झाली नाही. अखेर समशेर आणि राऊत यांनी ६ लाख रुपये एवढी लाच मागितली. त्यानंतर तडजोडी अंती ही रक्कम ३ लाख रुपये करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. लाचेची रक्कम खासजी एजंट पिंपळे हा स्वीकारणार होता. हा सर्वप्रकार एसीबीच्या निदर्शनास आला. सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर एसीबीने समशेर, राऊत आणि पिंपळे या तिघांवर कारवाई केली आहे.

ही कारवाई एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पो ना.प्रकाश महाजन, पो. ना. किरण अहिरराव, पो. ना. अजय गरुड , चा. पो. शि. परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.

दरम्यान, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. यासंदर्भात एसीबीकडे १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा आणि तक्रार द्यावी, असे आवाहन अधिक्षक वालावलकर यांनी केले आहे.

Nashik Trimbak Land Record ACB Trap Bribe Corruption


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… भोपळा हातात घेऊन विरोधकांचे आंदोलन (व्हिडिओ)

Next Post

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा...बजेट म्हणजे रिकामा खोका... सर्वसामान्यांना मिळाला भोपळा... भोपळा हातात घेऊन विरोधकांचे आंदोलन (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group