नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोमॅटो खरेदी करुन १७९ शेतकऱ्यांना पैसे न देता त्यांची १ कोटी ८० लाखाला दोन व्यापा-यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हे दोघे व्यापारी फरार झाले असून त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करावी यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे निवेदन दिले. त्याचप्रमाणे पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. नौशाद फारुकी व समशाद फारूकी असे फसवणूक करणा-या व्यापा-याचे नाव आहे.
पेठरोडवरील शरद पवार मार्केटमध्ये या दोन्ही व्यापा-यांनी सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून टोमॅटो माल खरेदी केला. पण, या शेतक-यांचे पैसे दिले नाही. तर काही शेतक-यांना या व्यापा-यांनी धनादेश दिले. ते धनादेश वटले नाहीत. त्यामुळे शेतक-यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. हे दोन्ही व्यापारी फरार झाले असून त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शेतक-यांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. कांदा, द्राक्ष व्यापारी यात पुढे होते. पण, आता टोमॅटो व्यापा-यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
Nashik Tomato Farmers 1 Crore 80 Lakh duped Crime