नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली नाशकातील लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे. आता थेट नाशिक तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम (रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर) हाच गळाला लागला आहे. तब्बल १५ लाखांच्या लाच प्रकरणी तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात महसूल सप्ताह साजरा होत असतानाच तहसिलदार लाच घेताना सापडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये मुरुम उत्खनन केले जात आहे. यामुळे नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० दंडाची नोटिस तहसील कार्यालयाने जागा मालकास दिली. या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमीन मालकाने सांगितले. याबाबत पडताळणी करणे कामी लाचखोर बहिरम याने जमीन मालकाला त्याच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले. परंतु जमीन मालक वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी एका व्यक्तीला तेथे पाठवले. ती व्यक्ती लाचखोर बहिरम यास स्थळ निरीक्षण वेळी भेटली. त्यावेळी लाचखोर बहिरमने १५ लाख रुपयांची लाच मागितली. सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज लाच म्हणून स्वीकारली. त्यामुळे लाचखोर बहिरम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
सापळा अधिकारी
संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक (संपर्क क्रमांक – 8605111234)
सह् सापळा अधिकारी
स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक
पो. ना. गणेश निबाळकर,
पो. ना. प्रकाश महाजन,
पो. शि. नितीन नेटारे.
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक संपर्क क्रमांक – +919371957391
मा. श्री. माधव रेड्डी* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक. संपर्क क्रमांक – 9404333049
मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. संपर्क क्रमांक – +917977847637
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.
nashik tehsildar naresh bahiram acb trap bribe corruption
crime police revenue