नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक स्मार्ट सिटीच्या कामकाजाचे वाभाडे पहिल्याच पावसात निघाले आहे. अनेक महिने रेंगाळलेल्या कामांमुळे यापूर्वीच नाशिककर स्मार्ट सिटीच्या कामांना वैतागले आहेत. त्यातच आता पहिल्या पावसामध्येच स्मार्ट कामांची पोलखोल झाली आहे. शहराच्या अनेक भागात पाणी तुंबल्याचे पहायला मिळाले. खासकरुन गोदावरी नदीलगत जुने नाशिक आणि रामकुंड परिसरातील रस्त्यावर प्रचंड पाणी तुंबले. तर, या पावसाच्या पाण्यात अनेक वाहने वाहून गेली आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. बघा त्याचा हा व्हिडिओ
nashik smart city work first rain water logging video