सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्ये बस चालकाने आत्महत्या केल्याची घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरी दरम्यान शिंदे वस्ती जवळ घडली. रात्री १ वाजता सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
नाशिक तालुक्यातील दोनवडे येथे राहणारे चालक राजू हिरामण ठुबे (४९) यांनी ही आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत समजेलली मााहिती अशी की, ठुबे हे नाशिक आगार १ येथे कार्यरत होते. ते नाशिक हे शिर्डी येथून नाशिककडे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवशाही बस घेऊन निघाले. पण, ही बस वावी ते पांगरी दरम्यान शिंदे वस्ती जवळ नादुरुस्त झाली. त्यानंतर या बसमधील प्रवाशांना अन्य बस मध्ये बसून देण्यात आले. ही बस नादुरुस्त झाल्याची माहिती देण्यात आली.
रात्री १ वाजता सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावेळी बसच्या पाठीमागच्या शीट वर गळफास घेतल्याचे आढळले. वाहन दुरुस्त पथकाने या घटनेची माहिती वावी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
Nashik Sinner ST Bus Driver Suicide Shivshahi