बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिकांना पाणी देण्यासाठी जात होता… अचानक बिबट्याचा तरुण शेतकऱ्यावर हल्ला…

by India Darpan
जुलै 28, 2023 | 7:35 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील खंडागळी सोमठाणे कृष्णा सोमनाथ गीते या १७ वर्षीय तरुणावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. तो पिकांना पाणी देण्यासाठी जात असतांना सकाळी सव्वा सहा वाजता हा हल्ला झाला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला, पाठीला, पोटाला गंभीर जखमा झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मेंढी भागांत यांची वस्ती असून वडिलांनी पिकांना पाणी देण्याचे सांगितल्याने तो शेताकडे जात होता. याचवेळी बिबट्याने कृष्णावर हल्ला चढविला. केला. पण, कृष्णाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. या घटनेनंतर कुटुंबियांना कृष्णाला वडांगळीला प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र डोक्यावर पोटावर जखमा असल्याने त्याला नाशिक सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर वाढला आहे. नाशिकमध्ये रस्त्यावरुन पायी जाणा-यांवर आठ दिवसापूर्वीच बिबट्याने हल्ला केला. तर दोन दिवसापूर्वी आडगाव येथे एका बंगल्यात बिबट्या मध्यरात्री शिरला. पण, बंगल्यातील कुत्र्यांनी त्याला पिटाळून लावले. वारंवार बिबट्याचा नागरी वस्तीत वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व भीती वाढली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘होय, आम्ही करोडपती-लखपती धुळवडकर’… नाशिकच्या शेतकऱ्यांनी लावले बॅनर्स… राज्यभर चर्चा

Next Post

एकीकडे नोकरी नाही, दुसरीकडे परीक्षा शुल्काद्वारे बेरोजगारांची सर्रास लूट… विधिमंडळात गाजला प्रश्न (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
vidhansabha

एकीकडे नोकरी नाही, दुसरीकडे परीक्षा शुल्काद्वारे बेरोजगारांची सर्रास लूट... विधिमंडळात गाजला प्रश्न (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011