India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिन्नरला बारावी परीक्षेचे पर्यवेक्षण करीत असताना शिक्षकाचा मृत्यू; शैक्षणिक क्षेत्रात हळहळ

India Darpan by India Darpan
March 9, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील महात्मा ज्योतीराव फुले विद्यालयात इयत्ता 12 वीच्या पेपरचे पर्यवेक्षण करीत असताना किरण भास्कर गवळी (वय ५१ वर्ष) या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळल्याचे पाहून शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. किरण गवळी यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

किरण गवळी हे मेकॅनिकल अभियंता होते. गेल्या 25 वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेत कार्यरत होते. दांडगा जनसंपर्क, मोठा मित्र परिवार आणि विद्यार्थ्यांमध्ये गवळी सर म्हणून ते प्रसिद्ध होते. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आयुष्यात उभे राहण्यासाठी त्यांनी प्रचंड मदत केली. उत्तम वक्ता, प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले. संस्थेच्या विविध इमारती, लॅब, शिक्षण मार्गदर्शन केंद्र उभारणीसाठी त्यांनी मोठा हातभार लावला.

सिन्नर येथील सहकार क्षेत्रांतील कार्यकर्ते, सिन्नर वैभवकार कै. भास्कर संभाजी गवळी यांचे किरण हे पुत्र होते. किरण यांनी नुकतीच पन्नाशी ओलांडली. त्यानिमित्त सर्व वर्गमित्रांचे गेट टुगेदर सिन्नर येथे झाले. जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी सविता, मुलगी तारका आणि मुलगा ओम असा परिवार आहे. सर्वस्तरातून किरण यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे.

Nashik Sinner HSC Exam Teacher Death on Duty


Previous Post

हॉलमार्क नसलेले जुने दागिने १ एप्रिलपासून बिनकामाचे? ते परत घेतले जाणार नाहीत? कवडीमोल भावाने विकावे लागतील?

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हे नक्की तुमच्या नजरेस येईल

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - हे नक्की तुमच्या नजरेस येईल

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group